शेतमालाला लाभकारी हमी भाव देणारा कायदा करा-भारतीय किसान संघ

शेतमालाला लाभकारी हमी भाव देणारा कायदा करा-भारतीय किसान संघ

रावेर - प्रतिनिधी raver

देशात भारतीय किसान संघाकडून दि.१ ते ११ जानेवारी दरम्यान शेतमालास लाभकारी मूल्य देणारा कायदा करण्याबाबत जनजागरण अभियान घेतले. याबाबत रावेर येथे तहसीलदार (Tehsildar) यांना निवेदन देण्यात आले आहे.

यासाठी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, शेतकऱ्याला आर्थिक स्वातंत्र्य बहाल करा, देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. याचा सर्वांना अभिमान व आनंद आहे. परंतु आजही भारतीय शेतकऱ्याचे आर्थिक पारतंत्र दूर झालेले नाही. शेतकऱ्याला आपल्या उत्पादीत मालाचा भाव ठरवण्याचे स्वातंत्र्य नाही. व्यापाऱ्यांनी तो लिलावाद्वारे ठरवावा, वितरण आणि साठ्यावर सरकारने नियंत्रण ठेवावे अशी स्थिती आहे. शेतमालास उत्पादन खर्चाइतका सुद्धा भाव वर्षानुवर्षे न मिळाल्याने,शेतकरी दरिद्री होऊन त्याची दयनीय अवस्था झाली आहे.

कर्जातून बाहेर पडता न आल्याने शेतकरी आत्महत्याद्वारे आपले जीवन संपत आहे. या आत्महत्या थांबता थांबत नसल्याने हमीभाव देणारा कायदा आणावा अशी मागणी किसान संघाने केली आहे. याबाबत तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी अमोल गणेश पाटील (केऱ्हाळे), नितीन पाटील (नेह्ता), सुमित पाटील हे शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com