गावठी दारुच्या हातभट्ट्या उद्धवस्त
चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी
चाळीसगाव (police) पोलिसाच्या हद्दीतील टाकळी प्र.चा, ओझर, पातोंडा, वाघडू या चार गावांमध्ये अवैद्यरित्या सुरु असलेल्या गावठी दारुच्या हातभट्ट्यावर पोलिसांनी छापा टाकून तब्बल एक ते दिड लाख रुपयांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट केल्याची माहिती पोलीस सुुत्रांकडून मिळाली आहे. ही कारवाई आज (दि,२८) रोजी संकाळी ६ वाजेच्या सुमारास करण्यात आली.
चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक के.के.पाटील (pi k.k.patil) यांना टाकळी प्र.चा, ओझर, पातोंडा व वाघडू या गावात अवैद्यरित्या गावठी दारुचे अड्डे सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्या अनुंषगाने त्यानी पोलिसांचे पथक तयार करुन आज संकाळी टाकळी प्र.चा, ओझर, पातोंडा, वाघडू या गावातील नदी किनारी, नाल्यालगत व झाडाझुपांमध्ये अवैद्यरित्या सुरु असललेल्या गावठी दारुच्या अड्ड्यावर छापेमारी केली. त्याठिकाणी दारु तयार करण्याचे १५ हजार लिटर कच्चे-पक्के रसायन, जवळपास २५ लिटर तयार दारु असा एकूण एक ते दिड लाखांचार मुद्देमाल पोलिसांना आढळुन आला. पोलिसांनी तो जागेवरच नष्ट केला. याप्रकरणी (chalisgaon) चाळीसगाव पोलीस स्टेशनला चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. हि कारवाई वरिष्ठ आधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली पो. निरिक्षक के.के.पाटील, एपीआय सागर ढिकले, पीएसआय सुहास आव्हाड, एपीआय अनिल आहिरे, पोकॉ. अजय मालचे, पंकज पाटील, भूषण पाटील, दिपक पाटील, अनिल पाटील, शैलैश पाटील