
जळगाव jalgaon। प्रतिनिधी
अमृत योजना 2.0 (Amrit 2.0)या दुसर्या टप्याचे कामाचा विकास आराखडा तयार करण्याबाबत व्यवस्थापन सल्लागार (management services) नेमणुकीवर दोन ते तीन महिन्यापासून वाद होता. महासभेत दोन वेळा विषय येवून त्यावर मोठा गदारोळ देखील झाला होता. त्यानंतर महापालिकेने मजीप्राला (Majipra) हे काम करण्याबाबत पत्र व्यवहार केला होता. त्यानुसार मजीप्राने मनपाला (Municipality) पत्र दिले असून हे काम करण्यास तयार असल्याचे नमूद करत करारनामा करण्याची कार्यवाही करण्याचे सांगितले आहे.
जळगाव शहराला केंद्राची अमृत योजने अंतर्गत जलवाहिनीचे पहिल्या टप्याचे काम संपण्याच्या मार्गावर आहे. त्यात अमृत 2.0 हे दुसर्या टप्यातील कामाच्या व्यवस्थापन नेमणूक बाबत प्रशासन व सत्ताधारी पक्ष तसेच विरोधीपक्षातील भाजपा यांच्यात पेच निर्माण झाला होता. त्यात याच कारणावरून आयुक्तांच्या बदली झाल्याचे देखील चर्चा होती. त्यामुळे अजून ही आयुक्त बदलीचा तिढा अजून ही सुटलेला नाही.
मजीप्राला मनपाने दिला होता प्रस्ताव
अमृत योजने अंतर्गत जलवाहिनी व मल्लनिस्सारण योजनेचे विस्तृत दुसर्या टप्यातील कामाच्या व्यवस्थापन सल्लागार सेवा पूरविण्याबाबत 11 नोव्हेंबरला महापालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधीकरण यांना पत्राद्वारे प्रस्ताव दिला होता. यात योजनेचा आरखाडा शासनाच्या मार्गदर्शक सुचनानूसार अहवाल तयार करण्याचे नमूद केले होते. तसेच मजीप्राने मेहनाता रक्कमेत काम करण्यास तयार आहे का असे पत्र दिले होते.
मजीप्रा 3 टक्केनुसार शुल्क घेणार
महापालिकेच्या प्रस्तावर महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने 19 डिसेंबरला मनपाला पत्र पाठविले असून मजीप्रा प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार सेवा पुरविण्याबाबत तयार असून सदर कामाच्या कमितींच्या कमाल 3 टक्के नूसार शुल्क घेतले जाईल. त्यानुसार महापालिका प्रशासनाने करारनामा करण्याची आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी असे पत्र मनपाला दिले आहे.