
जळगाव jalgaon। प्रतिनिधी
दारु पिण्यासाठी (Drunk)पैसे न दिल्यामुळे दारुच्या नशेत असलेल्या एकाने कॉन्ट्रॅक्टरच्या (contractor) डोक्यात (head) लोखंडी सळई (Iron rod) टाकून त्याला गंभीर दुखापत (injury)केल्याची घटना चिंचोली येथील महावितरणच्या स्टेशनमध्ये घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मारहाण करणार्याला पोलिसांनी अटक केली आहे.
शहरातील अयोध्यानगर येथे संजय रामभाऊ वराडे कॉन्ट्रॅक्टर वास्तव्यास आहेत. ते रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तालुक्यातील चिंचोली येथील महावितरणच्या स्टेशनच्या आवारात असताना, या ठिकाणी जालम शोभाराम पवार हा आला. तो दारूच्या नशेत होता. या दरम्यान त्याने संजय वराडे यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले. वराडे यांनी पैसे देण्यास नकार दिला असता जालम पवार याने लोखंडी आसारी वराडे यांच्या डोक्यात मारून दुखापत केली तसेच शिवीगाळ करत त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
घटनेनंतर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास याप्रकरणी संजय वराडे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली या तक्रारीवरून जालम शोभाराम पवार रा. सुप्रीम कॉलनी जळगाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित जालम पवार यास पोलिसांनी अटक केली आहे.पुढील तपास पोना मुदस्सर काझी हे करीत आहेत.