महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक देशद्रोही

भाजपचा आरोप; टॉवर चौकात मलिक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; राजीनाम्याची मागणी
महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक देशद्रोही

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

शहरातील टॉवर चौकात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Minority Minister Nawab Malik) यांचे कुख्यात अंडरवर्ल्ड माफियांसोबत (Underworld mafias) संबंध उघडकीस आल्याने भाजप युवा मोर्चा, (BJP Youth Front) जळगाव जिल्हा महानगरतर्फे बुधवारी जळगावातील टॉवर चौकात नवाब मलिकांचे प्रतिकात्मक पुतळ्याला चपलेने मार देत पुतळ्याचे दहन (Burning of the statue) करण्यात आले.

नवाब मलिकांचा धिक्कार असो, मुर्दाबाद मुर्दाबाद नवाब मलिक मुर्दाबाद.. अशी जोरदार घोषणाबाजी करत यावेळी नवाब मलिक यांच्यासह शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. नवाब मलिक देशद्रोही असल्याचा आरोप करत, त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी यावेळी करण्यात आली आहे. आंदोलनाला जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, प्रदेश महिला उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, महानगराचे सरचिटणीस नितीन इंगळे, महानगर उपाध्यक्ष राजेंद्र मराठे, युवा मोर्चा महानगर अध्यक्ष आनंद सपकाळे, महिला मोर्चा अध्यक्ष दीप्ती चिरमाडे, महानगर चिटणीस राहुल वाघ, विधानसभा क्षेत्रप्रमुख दीपक साखरे, जळगाव तालुका अध्यक्ष गोपाल भंगाळे, नगरसेवक विरेन खडके, व्यापारी आघाडीचे अशोक राठी, दिव्यांग आघाडीचे गणेश वाणी, कामगार आघाडीचे कुमार सिरामे, युवा मोर्चा सरचिटणीस अक्षय जेजुरकर, मिलिंद चौधरी, जितेंद्र चौथे, उपाध्यक्ष गणेश महाजन, स्वामी पोतदार, विकी सोनार, राहुल मिस्त्री, जयेश ठाकुर, चिटणीस सागर जाधव, अश्विन सैंदाणे, गौरव पाटील, रेखाताई पाटील, तृप्ती पाटील, लता बाविस्कर, ज्योती निंभोरे, रेखा कुलकर्णी, रेखा वर्मा, सुरेखा अमृतकर, नितू परदेशी, उषा पाठक, स्नेहा निंभोरे पुष्पेंद्र जोशी, हर्षल चौधरी, निखिल सूर्यवंशी, महेश राठी, आकाश चौधरी, भूषण आंबीकर, संतोष बाविस्कर, अश्फाक शेख, तालुका सरचिटणीस अरुण सपकाळे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सचिन पवार, पंचायत समिती सदस्य मिलिंद चौधरी, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब पाटील, तालुका चिटणीस गिरीश वराडे, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष वासुदेव कोळी, उपसरपंच कडगाव चेतन पाटील, माजी तालुकाध्यक्ष संजय भोळे, तालुका सरचिटणीस ललित बर्‍हाटे, भुषण पाटील, सागर घुगे, पवन पाटील, प्रकाश पंडित,गणेश माळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com