चाळीसगाव येथे महाराष्ट्र बंदला समिश्र प्रतिसाद

चाळीसगाव येथे महाराष्ट्र बंदला समिश्र प्रतिसाद

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपुर खेरी (Lakhimpur) येथे शेतकर्‍यांच्या अंगावर भरधाव गाडी घालून निष्पाप शेतकर्‍यांना (farmers) चिरडून ठार (Crushed to death) मारण्याच्या घटनेच्या निषेधात भाजप (BJP) विरुध्द आज राज्यातील सत्ताधारी पक्षांनी (ruling parties) पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला (Maharashtra closed) चाळीसगाव तालुक्यात समिश्र प्रतिसाद (Mixed response) मिळाला.

महाविकास आघाडीतील मित्रपक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बंदचे आवाहन करीत रॅली काढली. या रॅलीसोबत पोलीसांचा फौजफाटा होता. एकूणच शहरातील प्रमुख बाजारपेठा, कॉम्पलेक्समधील अत्यावश्यक व्यवसायांंसह काही दुकाने अर्धवट उघडी तर काहींनी पूर्णपणे बंदला पाठींबा दर्शविला असल्याचे चित्र शहरात दिसून आले.

बोढरे येथे रॅली काढून निषेध

तालुक्यातील बोढरे, शिवापूर, पिंपरखेड, लोंजे, या गावातील सोलर पिडीत शेतकर्‍यानी मिळून केंद्र शासनाचा निषेध नोंदवला. शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने, अन्यायग्रस्त सोलर प्रकल्प पिडीत शेतकर्यांनी लखिमपूर खिरी घटनेच्या निषेधार्थ मोदी सरकारच्या विरोधात काळ्या फिती लावून , काळे झेंडे दाखवत निदर्शने, घोषणा दिल्या, मोजक्या शेतकर्यांसह. गावातून रॅली काढून जाहीर निषेध नोंदवला.

राज्याच्या महाविकास आघाडी सरकारडून पुकारण्यात आलेल्या आजच्या महाराष्ट्र बंद हाकेला प्रतिसाद दर्शविला. या प्रसंगी समितीचे सचिव भिमराव जाधव, ऍड.भरत चव्हाण यांच्यास इतरांनी घटनेचा तिव्र शब्दात निषेध नोंदवला. या प्रसंगी समितीचे जेष्ठ मार्गदर्शक चत्रू राठोड, उपाध्यक्ष चुनिलाल राठोड, पिडीत शेतकरी सोमा राठोड, भगवान राठोड , मदन राठोड यांच्यासह बोढरे, शिवापूर , लोंजे, पिंपरखेड येथील शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.