महाराणी येसूबाईंचा स्वातंत्र्य लढ्यातील त्याग आणि समर्पण मार्गदर्शकच : प्रा. वैशाली सपकाळे

नूतन मराठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात सावित्रीबाई ते राजमाता जिजाऊ व्याख्यानमाला
महाराणी येसूबाईंचा स्वातंत्र्य लढ्यातील त्याग आणि समर्पण  मार्गदर्शकच : प्रा. वैशाली सपकाळे

जळगाव jalgaon

पती हयात असतांना तब्बल 29 वर्ष विधवेचे सोंग (Widow's disguise) घेवून स्वातंत्र्य लढ्यात (freedom struggle) त्याग आणि समर्पण देणारी महाराणी येसूबाई (Empress Yesubai) आजच्या महिलांपुढेच नव्हे तर पिढ्यांन पिढ्यांना मार्गदर्शकच (way-maker) ठरत आहेत. असे प्रतिपादन प्रा. वैशाली सपकाळे (Prof. Vaishali Sapkale) यांनी व्यक्त केले.

Nutan Martha college logo
Nutan Martha college logo

नूतन मराठा महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती ते राजमाता जिजाऊ जयंती म्हणजेच 3 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान कर्तृत्ववान महिलांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांची यशोगाथा सांगणार्‍या व्याख्यानमालेस सुरुवात झाली. या व्याख्यानमालेचे दुसरेे पुष्प प्रा.वैशाली सपकाळे यांनी गुंफले.

दुसर्‍या दिवसाचं पुष्य गुंफताना प्रा. वैशाली सपकाळे यांनी विस्तवासारखे वास्तवाचे चटके अंगावर झेलत मोगलांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार्‍या त्यागमुर्ती अर्थात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला.

आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात त्यांनी महाराणी येसूबाई यांच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकून त्यांची स्वराज्य प्रेरणा, त्याग आणि समर्पण आजच्या महिला आणि येणार्‍या अनेक पिढ्यांना निश्चितच मार्गदर्शक म्हणून ठरेल.

आपल्या शुरविर निधड्या छातीच्या पतीच्या स्वातंत्र्यलढयात, स्वतःला झोकून देत पती हयात असताना तब्बल 29 वर्षे वैधव्य पत्करणारी महाराणी येसूबाई म्हणजे त्या निधड्या छातीच्या छावा ला अर्थात आमच्या शुरविर शंभू राज्यांना शोभून दिसणारी खरीखुरी शेरणीच होत. त्यांच्या पती भक्ती आणि राष्ट्रभक्ती ला मानाचा मुजरा करत प्रा. वैशाली सपकाळे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाचा समारोप केला.

deshdoot logo
deshdoot logo

कार्यक्रमाची सुरुवात जया साळूंके यांच्या सुमधूर आणि गोड आवाजातील जिजाऊ वंदनाने झाली. यावेळी एफ. वाय. बीए. च्या वर्गातील दिव्यांग जिज्ञासू विद्यार्थी शुभम भुसारी याचा सत्कार करण्यात आला. उपप्राचार्य प्रा. राजेंद्र देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाराणी येसूबाई यांच्या राष्ट्रभक्तीच्या विविध पैलूंवर दृष्टीक्षेप टाकला.

याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एन. जे. पाटील, उपप्राचार्य प्रा. आर. बी. देशमुख, सर्व शाखेतील विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि बहूसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

सदर व्याख्यानमालेच़ं आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून प्रा. इंदिरा पाटील यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. सूत्रसंचालन अर्थशास्त्र विभागाच्या प्रा. भाग्यश्री होले यांनी तर आभारप्रदर्शन हिंदी विभागाच्या प्रा. तेजस्विनी पाटील यांनी केले.

Related Stories

No stories found.