श्री क्षेत्र खर्ची हेच सप्तशृंगी देवीचे माहेर- स्वामी माधवानंद सरस्वती

पुराणातील ६८ पुरावे शासन दरबारी सादर, चरण पादुका दिंडी सोहळातून प्रचार-प्रसार
श्री क्षेत्र खर्ची हेच सप्तशृंगी देवीचे माहेर- स्वामी माधवानंद सरस्वती

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

सप्तशृंगी देवीच्या (Sapthasringi Devi) अवतार कार्याला नऊ हजार वर्षे पूर्ण झाले असून देविचे माहेर म्हणजेच अवतार स्थळ (सिद्धचंद्रवट) श्री क्षेत्र खर्ची आश्रम ता.एरंडोल आहे. यासंबंधीचे पुराणातील ६८ पुरावे शासन दरबारी सादर केले आहेत. तसेच शासनाकडून देखील त्याला मान्यता मिळाल्याचा दावा आश्रमाचे महामंडलेश्वर स्वामी माधवानंद सरस्वती यांनी पत्रकारांशी बातचीत करतांना केला आहे.

देविच्या अवतार कार्याला नऊ हजार वर्षे पूर्ण झाले त्या निमित्ताने खर्ची आश्रम येथून देवीच्या चरण पादुका व दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याच्या प्रचार-प्रसार खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुबार या जिल्ह्यामधून महामंडलेश्वर स्वामी माधवानंद सरस्वती करुन, वापस आज खर्ची येथे जात असताना या दिंडीचे आगमण चाळीसगाव येथे झाले, याप्रसंगी त्यांनी पत्रकरांना माहिती दिली. दिंडी सोहळ्याचे सयोजक तथा स्वमींचे शिष्य शिवदास चौधरी, चंद्रकांत माहाजन, विजय भंगाळे हेही उपस्थित होते. चाळीसगावातील काही भाविकांनी या पादूकांचे भक्तीभावाने दर्शन घेतले. त्यानंतर दिंडी खचीॅ येथे रवाना झाली. महामंडलेश्वर स्वामी माधवानंद सरस्वती यांनी सप्तशृंगी देविच्या बाबत सविस्तर माहीती सांगीतली. सप्तशृंगी देवी ही पार्वती मातेचा पाचवा आवेश अवतार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या अवतार कार्यास नऊ हजार वर्षे पूर्ण झाली आहे. या देवीने एरंडोल तालूक्यातील खर्ची आश्रम या ठिकाणी अवतार घेतला आहे. म्हणूणच हे ठिकाण सप्तशृंगी मातेचे माहेर आहे. असा दावा स्वामींचा आहे. या अवतार कार्यातून खानदेशात देविने अनेक असूरांचा नाश केला.त्यातून ४० शेक्ती पिठे तयार झाली आहेत. याबाबतचा सविस्तर उल्लेख भागवत, विष्णू पूराण , ब्रम्हपूराण, ब्रम्हांड पूराण, श्रिमतदेवी भागवत, कालीका पूराण या सह चौदा पूराणांमधे असल्याचा दावा माधवानंद सरस्वती यांनी केला आहे. देवीचे अवतार स्थळ असलेल्या जागी गेल्या ३३ वर्षापासून आता सिध्दचंद्रवट तिर्थक्षेत्र तयार झाले आहे. सप्तशृंगी देवीचे एरंडोल तालूक्यातील खर्ची असलेल्याचा पुराव सिध्दचंद्रवड या ग्रथात असल्याचा स्वामीचे म्हणने असून त्यासंबंधी तब्बल ६८ पुरावे शासनदरबारी दिले असल्याची देखील त्यांनी माहिती दिली आहे. तसेच देवीच्या माहेर असलेल्या स्थाळाचा महिमा देशभर पसराव यासाठी आपण हे कार्य करीत असल्याचे ते म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com