मध्यप्रदेश परिवहन महामंडळाची बस उलटली ; वाहक ठार , 15 जखमी पैकी तीन गंभीर

मध्यप्रदेश परिवहन महामंडळाची बस उलटली ; वाहक ठार , 15 जखमी पैकी तीन गंभीर

पिंप्रीनांदू Pimprinandu (ता.मुक्ताईनगर)

तालुक्यातील करकी फाट्याजवळ मुक्ताईनगर बऱ्हाणपूर रस्त्यावर (Muktainagar Barhanpur Road) उज्जैन शेगाव या मध्य प्रदेश (Madhya Pradesh) परिवहन च्या बसला (Transport Corporation bus) अपघात (Accident) होऊन बस उलटल्याने या बसवरील क्लिनर जागीच ठार (Carrier killed) झाला तर त्यातील 16 प्रवासी (passenger) जखमी (seriously injured) झाल्याची घटना आज सायंकाळी साडेपाच ते सव्वा सहा वाजेच्या दरम्यान घडली.

मध्यप्रदेश परिवहन महामंडळाची बस उलटली ; वाहक ठार , 15 जखमी पैकी तीन गंभीर
जाणून घ्या जैन तीर्थकरांच्या जीवनातील कल्याणकारी पंचकल्याणक

याबाबत अधिक माहिती अशी की , उज्जैन ते शिर्डी या नावाचे फलक असलेल्या मध्य प्रदेश परिवहन महामंडळाची एम. पी.13 पी.13 43 या क्रमांकाची बस बऱ्हाणपूर येथून मुक्ताईनगरकडे निघाली असता करकी फाट्यावर साडेपाच ते सव्वा सहा वाजेच्या दरम्यान आली असता त्या ठिकाणी बसचे स्टेरिंग मध्ये बिघाड (Failure in steering) झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला यात बस उलटली (bus overturned) त्यात वाहक हा खाली फेकला गेला व त्यावर बस उलटल्याने विनोद चिंतामण गुजर (वय 35 वर्षे) राहणार मोडिया तालुका आगर मालवा (मध्य प्रदेश) हे जागीच मयत (Death on the spot) झाले.

मध्यप्रदेश परिवहन महामंडळाची बस उलटली ; वाहक ठार , 15 जखमी पैकी तीन गंभीर
चुंचाळ्यात उद्या साजरा होतोय गुरूशिष्य पुण्यतिथीचा अनोखा सोहळा

तर या बसमध्ये बसलेले प्रवासी महेक बी शेख जलील (वय 30वर्ष) रावेर, शबीना बी शेख वसीम (वय 25 ) सावदा , सायराबी निसार शेख (वय 45 वर्षे ) मुक्ताईनगर , अलिजा बी शेख वसीम (4 वर्षे) सावदा, सय्यद अकबर कुरेशी (वय 46 वर्षे ) मलकापूर हे जखमी असून सध्या मुक्ताईनगर येथील डॉक्टर जगदीश पाटील यांच्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.तर शेख फैजान शेख मज्जित ( वय 7 वर्ष) मलकापूर , हर्षद शेख मज्जित (वय 40 वर्षे) मलकापूर, हंसराज भगवानसिंग परदेशी (वय 55 वर्षे) मलकापूर , शेषराव जानूजी तायडे (वय 49 वर्षे) राहणार बोरवंड तालुका नांदुरा , पुष्पा संजय गायकवाड (वय 59 वर्षे) खामगाव , पद्माबाई देविदास सूर्यवंशी (वय 55 वर्षे) राहणार खामगाव , सय्यद अकबर सय्यद वजीर (वय 43 वर्षे ) राहणार मलकापूर अशाप्रकारे 15 जण जखमी (seriously injured ) झाले जळगाव येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

मदतीचा हात

अपघात झाल्याचे समजता बरोबर या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी तसेच करकी नायगाव अंतुरली धाबे मुक्ताईनगर पूर्णाड फाटा येथील लोकांनी अपघातस्थळी भेट घेऊन उलटलेल्या बसला सरळ करण्यासाठी जेसीबी आणले तर काहींनी जखमींना तात्काळ मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात तर काहींना बऱ्हाणपूर येथे हलविण्यात आले.

मध्यप्रदेश परिवहन महामंडळाची बस उलटली ; वाहक ठार , 15 जखमी पैकी तीन गंभीर
घरात सुरू होता बनावट दारूचा कारखाना : पोलिसांच्या धाडीत झाला उद्धवस्त

Related Stories

No stories found.