एम.ए. मानसशास्त्रात प्रथम येणार्‍यास मिळणार कै. सुमन जगन्नाथ बारी सुवर्णपदक

एम.ए. मानसशास्त्रात प्रथम येणार्‍यास मिळणार
कै. सुमन जगन्नाथ बारी सुवर्णपदक

जळगाव jalgaon

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University) परिक्षेत्रातील महाविद्यालयांमधून एम.ए. मानसशास्त्र (M.A. Psychology) या विषयात प्रथम येणाऱ्या (First come first served) विद्यार्थी/विद्यार्थींनीस “कै.सुमन जगन्नाथ बारी सुर्वण पदक“ (“Late Suman Jagannath Bari Survan Padak) प्रदान करण्यासाठी प्रा.डॉ. सीमा सुरेश बारी व माजी सैनिक श्री. जगन्नाथ झावरू बारी यांनी एकत्रीत दोन लाख रुपयांचा धनादेश प्रभारी प्र- कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार यांच्याकडे सुपूर्द केला.

प्रा. डॉ. सीमा सुरेश बारी ह्या धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे सहा.प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तर श्री. जगन्नाथ झावरू बारी हे माजी सैनिक आहेत. कै. सुमन बारी ह्या प्रा.सीमा बारी यांच्या सासु असून श्री. जगन्नाथ बारी यांच्या पत्नी होत्या. त्यांनी कै. सुमन जगन्नाथ बारी यांच्या नावे सुवर्णपदक जाहिर केले असून त्यासाठी दोन लाख रुपयांचा धनादेश त्यांनी प्रभारी प्र-कुलगुरुंकडे सुर्पूर्द केला.

यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्राचार्य एल.पी.देशमुख, प्रा.मोहन पावरा, प्रभारी कुलसचिव प्रा.आर.एल. शिंदे, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.किशोर पवार, प्रभारी वित्त व लेखा अधिकारी प्रा.मधुलिका सोनवणे हे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com