ओव्हर टेकच्या नादात लक्झरी पलटी

पाळधी गावानजकची घटना : जखमींवर उपचार सुरू
ओव्हर टेकच्या नादात लक्झरी पलटी

जळगाव - Jalgaon

अकोला येथून अहमदाबादकडे जाणारी बस ओव्हरटेक (Bus Overtake) करण्याच्या नादात राष्ट्रीय महामार्गावर पाळधी गावाजवळील हॉटेल सुगोकी जवळ रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास पलटीझाल्याची घटना घडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ३० ते ३५ प्रवासी जखमी झाले आहे. जखमींवर जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

अकोला येथून अहमदाबाद येथे जाण्यासाठी बस क्रमांक (जीजे.१८.बीव्ही.३०४२) ही निघाली होती. धरणगावकडे जाणाऱ्या महामार्गावर पाळधी गावानजीक असलेल्या सुगोकी हॉटेलजवळील महामार्गावर रात्री ८ वाजेच्या सुमारास बस अचानक रस्त्याच्या कडेला उलटली. अपघातात अंदाजे २५ ते ३० जण जखमी झाले असून जळगाव जिल्हा रुग्णालयात १७ जखमींना आणण्यात आले आहे.

पालकमंत्र्यांची मदतीसाठी धाव

पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील हे देखील रात्री याच रस्त्याने वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आपल्या निवासस्थानी जात असतांना त्यांना अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स दिसून आली. पालकमंत्री यांनी लागलीच आपल्या वाहनांचा ताफा थांबवित लक्झरीमधून जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेला पाचारण केले. पालकमंत्री व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जैन कंपनीच्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून त्यांनी रुग्णालयात दाखल केले आहे.

जखमींवर उपचार सुरू

अपघातात अमिना इस्माईल वय-३, सलीम जुनेद ३२, आबेदा सलीम २५, अन्वर मिया १३, सुलतान बाबाजी भाई ४०, निकत बाबजी भाई २४, गिरिषभाई प्रजापती २८, योगिता सनंसे २३, परमेश्वर वाळूके २७, शुभम कोल्हे २४, अमिनाबी अली ५४, कविता लालजी भाई ३९, रोनक लालजी भाई १६, मनोजकुमार २२, प्रज्ञा मिलन पटेल २३, प्रतीक बोदडे २४, दर्शन बोदडे १४, मनू मोहंमद २२, ज्ञानेश्वर सोनवणे २, शाम मुंढे २२, शुभम देशमुख २७, रियाज पटेल ४, रितिका पटेल ४२ हे या जखमींवर उपचार सुरू आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com