पैसे दुप्पट करण्याचे आमिषः 40 लाखांत फसवणूक

पैसे दुप्पट करण्याचे आमिषः 40 लाखांत फसवणूक

चाळीसगाव । Chalisgaon

स्मार्ट व्हिजन मल्टिरियल सोलुशन प्रा. लि. नागपूर या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूक केलेली रक्कम सहा महिन्यांतच दामदुप्पट करून देतो, अशी खोटी आमिषे दाखवून चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेडे येथील शेतकरी पुंडलीक दौलत पाटील यांची 40 लाख 2 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पैसे दाम दुप्पटच्या आमिषाने दि,6 ऑक्टोबर 2010 मध्ये पुंडलीक दौलत पाटील यांनी संजय उमाटे यांच्या कंपनीच्या नावाने असलेल्या बँकेत ऑनलाईनने दोन हजार रुपयांची रक्कम सुरुवातीला भरली. त्यानंतर टप्याटप्याने त्यांनी बँकेत 40 लाख रुपयांची रक्कम गुंतवणूक केली.त्यानंतर पाटील यांनी नागपूर येथील कंपनीच्या कार्यालयात जावून चौकशी केली.

गुंतवणुकीच्या रकमेला सहा महिने झाल्यानंतर पाटील यांनी पैशाची मागणी केली असता, सदर कंपनीचे संजय उमाटे यांनी वेळोवेळी उलट उत्तरे देवून पैसे देण्यास टाळाटाळ केली.नागपूर येथील कंपनीचे कार्यालय व मोबाईल फोन बंद करून पळून गेल्याची खात्री झाल्यावर पुंडलीक पाटील यांनी याबाबत धंतोली पोलीस स्टेशन नागपूर व पोलीस अधिक्षक जळगाव यांच्या कार्यालयात ऑनलाईनने तक्रार केली होती. भूलथापा मारून गुंतवणूक केलेली रक्कम आज पावेतो परत न मिळाल्याने अखेर पुंडलीक पाटील यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन गाठून कंपनीचे संचालक संजय उमाटे यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे.त्यावरून पोलीसात भादंवि कलम 420,406 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com