जिल्ह्यात लंपीचा उद्रेक; 3 हजार गुरे बाधित

15 तालुक्यात गुरांना लंपीचा संसर्ग; उपाययोजना तोकड्या
जिल्ह्यात लंपीचा उद्रेक; 3 हजार गुरे बाधित

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुका संसर्गापासून (lumpy infection) अद्यापपर्यंत दूर होता. मात्र, शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार (lumpy infection) या तालुक्यातीलही गुरांनाही (Cattle too) लंपी विषाणूची लागण (Lumpy virus infection) झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात सर्वच 15 तालुक्यात (taluk) गुरांना (cattle) लम्पीचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात 3 हजार गुरे बाधित (affected) झाले असून 165 गुरांचा मृत्यू (Death of cattle) झाला आहे.

जिल्ह्यात 4 लाख 69 हजार 700 लंपी प्रबिंधक उपलब्ध आहे. मात्र अद्यापर्यंत लस उपलब्ध असतानाही 2 लाख 51 हजार गुरांनाच लसीकरण झाले आहे. पशुसंवर्धन विभाग जिल्ह्यात गुरांना लसीकरण करण्यात मनुष्यबळाअभावी कमी पडत असल्याचे चित्र आहे. त्यापैकी 3 लाख 26 हजार 302 गुरांचे लसीकरण अद्यापही बाकी आहे. रावेर, यावल, जामनेर, बोदवड तालुक्यात सर्वाधिक संसर्ग वाढला आहे.

त्यामुळे या तालुक्यातील स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जिल्ह्यात एकट्या रावेर तालुक्यात 800 पेक्षा जास्त गुरे बाधित झाली आहेत. त्यात जामनेर 682, बोदवड 602, यावल 554, भुसावळ 331 गुरे लम्पी विषाणूने बाधित झाले आहेत. जिल्ह्यात लम्पी प्रतिबंधक लसीचा मोठा साठा उपलब्ध असतानाही गुरांवरील लसीकरणाला आवश्यक तेवढा वेग आलेला नाही. परिणामी संसर्ग वाढत आहे.

जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग आणि राज्याचा पशुसंवर्धन विभाग यांनी उपाययोजनांना वेग देण्याची गरज आहे. जिल्ह्यात एकूण गायव बैलांची संख्या 5 लाख 77 हजार 302 एवढी आहे. जिल्ह्यात रोटरीसह, सामाजिक संस्था, ग्रामपंचायत यांनी ग्रामीण भागात गुरांच्या लसीकरणासाठी पुढाकार घेतल्याने 4 लाख 57 हजार गुरांचे लसीकरण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र याबाबतच्या अधिकृत नोंदी नसल्याने त्यात संभ्रम आहे.

शासनाच्या घोषणा कागदावरच

एकीकडे शासनाकडून मोठमोठ्या मदतीची घोषणा होत असतांना मात्र प्रत्यक्षात या शेतकर्‍यांंना अद्यापही मदत म्हणून कवडीही मिळाली नसल्याची वस्तूस्थिती आहे. पशुसंवर्धन विभागातील शासकीय अधिकारी कागदी घोडे नाचविण्यापलिकडे वस्तूस्थितीवर अ्राधारीत कार्य करीत नसल्याचे चित्र दिसून येते.

शासकीय नियमाच्या आड लपून वेळकाढू भूमिका पशूसंवर्धन विभागातील अधिकारी घेत असल्याचे दिसून येत आहे. पशुसंवर्धन उपायुक्त आणि जि.प.सीईओंनी याबाबत युध्दपातळीवर मोहीम हाती घेण्याची गरज आहे. अन्यथा पुढील काळात जिल्ह्यातील लंपीने बाधित होणार्‍या गुरांची संख्या कमी न झाल्यास संसर्ग वाढत जाऊन गुरांचे मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी उपाययोजनांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com