
जळगाव jalgaon। प्रतिनिधी
पिंप्राळा परिसरातील (Pimprala area) अनेक नागरी वसाहतीमध्ये कमी दाबाने पाणी (Low pressure water supply) पुरवठा होत आहे. भर उन्हाळ्यात पुरेसा प्रमाणात पाणी येत नसल्यामुळे नागरिकांचे (Plight of citizens) हाल होत आहे. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या (Municipal Water Supply Department) या कारभारावर (administration)नागरिकांकडून (citizens) तीव्र संताप (Intense anger) व्यक्त केला जात आहेत.
जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील मयुर कॉलनी, गणपतीनगर, ओमकार पार्क, माधव नगर, साई कल्पना रेसिडेन्सी, सुख अमृत नगरसह सावखेडा रोड परिसरात महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून गेल्या महिना भरापासून कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा समस्या सहन करावी लागत आहे.
धरणात पुरेसा पाणी साठा तरी..
जळगाव शहराला पाणी पुरवठा करणार्या वाघूर धरणात दोन वर्ष पुरेल इतका पाणी साठा उपलब्ध असतांना शहरातील नागरिकांना पाण्याचे टँकर मागविण्याची वेळ आली आहे. मनपाच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकारी कर्मचार्यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
नागरिकांचा मनपाला इशारा
नागरिकांकडून मनपा प्रशासनाविषयी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या जात आहेत. याबाबत मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी देखील नागरिकांकडून करण्यात येत असून आयुक्तांनी दखल न घेतल्यास मनपावर हंडामोर्चा काढण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.
अनेक कॉलन्यांमध्ये कमी प्रमाणात पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेसा प्रमाणात पाणी मिळत नाही, यापुर्वी पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होत होता. मग आता ऐन उन्हाळ्यात कशामुळे कमी पाणी पुरवठा केला जात आहे.
विजयसिंग पाटील, नागरिक
गणपतीनगर मध्ये गेल्या महिना दीड महिन्यापासून कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाई भासत असून टँकरने पाणी आणण्याची वेळ रहिवाश्यांवर आली आहे.
गजानन बारी, नागरिक