जळगाव । jalgaon प्रतिनिधी
मुलींना (girls) काहीतरी आमिष दाखवून (baiting) पळवून नेण्याचे (kidnap) प्रकार वाढत आहेत. त्यानंतर जबरदस्तीने मुलींचे धर्मांत्तर (Conversion of girls) करुन लव्ह जिहादच्या (Events of Love Jihad) घटना वाढीस लागत आहे. आता उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही (Maharashtra) लव्ह जिहादविरोधीचा कायदा (Law of Love Anti-Jihad) अंमलात आणावा, यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती भाजपा महिला मोर्चाच्या (BJP Mahila Morcha) प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (State President Chitra Vagh) यांनी दिली.
जळगाव येथील भाजप कार्यालय वसंत स्मृती येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, बेटी बचाओ बेटी पढाओचे संयोजक राजेंद्र फडके,माजी आमदार स्मिता वाघ, प्रदेश महिला उपाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, महानगर जिल्हाध्यक्ष दीप्ती चिरमाडे, मनोज भांडारकर आदी उपस्थित होते.
त्या पुढे म्हणाल्या की, श्रध्दा वालकर हत्येने संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. उच्च शिक्षित मुलींनी प्रेम व विश्वासाने घर सोडले. त्यांना अशा घटनेला सामोरे जावे लागले. या घटनेतून धडा म्हणून पाहायला हवे. पालक आणि मुलांमधील संवाद का होत नाही? यासंदर्भात प्रत्येक आई-वडिलांनी विचार करण्याची गरज आहे.
15 ते 18 वर्ष वयोगटाच्या दरम्यान मुलींना फूस लावून पळवून नेले जाते. अज्ञान मुलींचे धर्मांतर केले जाते. अज्ञान मुलींच्या संरक्षणासाठी कायदा नसल्याने हा प्रश्न वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वेगवेगळ्या घटनेत महिला सुरक्षेसाठी काय उपयायोजना केल्या जात आहेत. यासंदर्भात पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. महिला सोशल मीडियाच्या माध्यमांवर स्टेटस ठेवतात. त्यावर गुन्हेगार नजर ठेवून असतात. त्यासाठी महिलांमध्ये जनजागृती होऊन त्याबाबत प्रचार, प्रसार व्हायला हवी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दि.3 नोव्हेंबर रोजी महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी मला दिली. तेव्हापासून माझा राज्यभर दौरा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य व केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी दौरे करीत आहे. तसेच भाजपाचे महिला संघटन मजबूत करण्यासाठी राज्यात प्रत्येक बूथवर 25 महिला असतील असेही त्यांनी सांगितले.
भारताची अर्थव्यवस्था स्थिर
कोरोना काळात संपुर्ण जग ठप्प होते. त्यावेळी सरकारला जनतेसाठी लस, धान्य यासह जीवनाश्यक बाबी पुरविवाव्या लागल्या. दोन वर्षांत शेजारच्या देशांची वाताहत झाली. मात्र, भारताची अर्थव्यवस्था स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. शिंदे-फडणवीस सरकारने स्वातंत्र्य सैनिकांसाठी निवृत्ती वेतन सुरू केले. अतिवृष्टीमुळे शेतकर्यांंच्या बाधित क्षेत्राची नुकसान भरपाई दोन हेक्टरवरून तीन हेक्टर केल्याने शेतकर्यांंमध्ये समाधान असल्याचे भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तसेच मोदी सरकारच्या योजनांवरही त्यांनी प्रकाशझोत टाकला.
प्रत्येक महिलेचा सन्मान राखला पाहिजे
महिलांविषयी चुकीच्या वक्तव्याचे समर्थन करणार नाही. प्रत्येक महिलेचा सन्मान राखला गेला पाहिजे. खा.संजय राऊत यांनी महिलेला हरामखोर म्हटले. एका महिलेस अश्लिल भाषेत शिवीगाळ केली, हा महिलांचा अपनाम नव्हे काय? अशा शब्दात त्यांनी खा.संजय राऊत यांचा समाचार घेत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्ष घरातून सरकार चालवले. पूर्वीचे फेसबुक सरकार होते. मात्र शिंदे-फडणवीस सरकारने लोकाभिमुख निर्णय घेऊन जनतेला दिलासा दिला. त्यामुळे शिंदे -फडणवीस सक्षम सरकार असल्याचे भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सांगितले.