
विवरे बुद्रुक (ता. रावेर) येथे सोमवारी रात्री चार चोरांनी बंदुकीचा धाक दाखवून चोरी केल्याची खळबजनक घटना घडली.१५ दिवसात दोन घटना घडलेल्या असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उटखेडा रोडवरील प्लॉट एरियातील रहिवासी किशोर पितांबर राणे यांच्या पत्नी व मुलं बाहेरगावी असल्याने ते घरी एकटेच होते. सोमवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास किशोर राणे लघुशंका करायला घराबाहेर पडले असता,वेगवेगळ्या बाजूने चार चोरटे या ठिकाणी आले, त्यांनी किशोर राणे यांचे तोंड दाबून कानाला बंदूक लावून, त्यांना घरात नेत घरातील पैसे व दागिन्यांची मागणी केली.
गोदरेजच्या कपाटाची चावी घेऊन कपाटातील दोन तोळे सोने व पंधरा हजार रुपये रोकड अशी काढून घेत. किशोर राणे यांचे तोंड व पाय दोराने बांधून चोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.काही वेळाने या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी गणेश धुमाळ यांनी पाहणी केली.गेल्या पंधरा दिवसात विवरे बुद्रुक गावात चोरीची दुसरी घटना असून,यापूर्वी देखील एकाच रात्रीत पाच ठिकाणी घरफोड्या झाल्या होत्या,त्यांचा तपास अद्यापही लागलेला नसताना,सोमवारी रात्री झालेल्या घरफोडीमुळे गावात खळबळ उडाली आहे.या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांच्या वचक संपल्याचे बोलले जात आहे. सोमवारी रात्री प्रभारी अधिकारी श्री.धुमाळ विवरा पोलीस चौकी हजर असताना,घटना घडलेली असल्याचे बोलले जात आहेत. यामुळे पोलिसांचे भय चोरांना नसल्याचे,यातून दिसून येत आहे.