
जळगाव - jalgaon
पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकामासाठी निविदा मंजूर करण्यात आली आहे. मात्र अद्यापर्यंत कार्यारंभ आदेश देण्यात आलेले नाहीत. लवकरात लवकर कार्यारंभ आदेश द्यावेत यासाठी लोहार ग्रामपंचायत सरपंचासह सदस्य व नागरिक बुधवारी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.
शिवसेनेचे जिल्हा परिषद गटनेते रावसाहेब पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य दिपकसिंग राजपूत, जिल्हा परिषद सदस्य पद्मसिंग पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी संजय गरुड यांनी आंदोलनस्थळी प्रत्यक्ष भेट घेत या आमरण उपोषणाला पाठींबा दिला आहे.