खिरोदा येथे गावठी कट्टयासह जिवंत काडतुस जप्त ; दोघांना अटक

खिरोदा येथे गावठी कट्टयासह जिवंत काडतुस जप्त ; दोघांना अटक

सावखेडा ता.रावेर - वार्ताहर raver

जिल्ह्यात अवैध धंदे विरोधात गेल्या चार दिवसापासून जोरदार कारवाई सुरु असून शुक्रवारी सावदा पोलीस (police) स्टेशन हद्दीतील खिरोदा येथील बसस्टॅण्ड परिसरात एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुससह दोघांना पकडण्यात आले.

दि.७ रोजी दोनजण मोटरसायकलने पालकडून सावदयाकडे जात होते. खिरोदयामध्ये सापळा रचून त्या दोघांना पकडण्यात आले. त्या दोघांकडून एक गावठी कट्टा व एक जीवंत काडतूस पकडण्यात आले. व मोटरसायकल ही जप्त करण्यात आली.

पोलीस महानिरीक्षकांचे विशेष पथक आणि सावदा पोलिसांनी संयुक्तपणे हि कारवाई केली. दोघांना ताब्यात घेऊन सावदा पोलीस स्टेशनला आणण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com