जिल्ह्यात चौघांवर वीज कोसळली

यावल तालुक्यातील डोंगरकठोरा, न्हावी, मुक्ताईनगरमधील निमखेडी तर बोदवडच्या चिंचखेडवर शोककळा
जिल्ह्यात चौघांवर वीज कोसळली

जळगाव jalgaon।

शुक्रवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह (With a thunderclap) झालेल्या पावसात (rain) जिल्ह्यातील चौघांच्या अंगावर (On all fours) वीज कोसळ्याने (Lightning strikes) त्यांचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली.

मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी येथील तर दुसरी घटना बोदवड तालुक्यातील चिंचखेड येथे घडली तर यावल तालुक्यात दोघांचा मृत्यू झाला असून त्यात एकजण डोंगरकठोरा तर दुसरा न्हावीचा असल्याने या गावांवर शोककळा पसरली आहे.

डोंगरकठोर्‍यात गुरख्याचा मृत्यू

यावल । यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील गुरे चारणार्‍या व्यक्तीच्या अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास आभाटा शिवारात घडली. ज्ञानेश्वर सुका बाऊस्कर- धनगर (वय-50, रा. डोंगर कठोरा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

ज्ञानेश्वर बाविस्कर हे आभाटा शिवारात आज 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता गुरे चारत असतांना वीजेच्या कडकडटासह पाऊस सुरू झाला. त्यावेळी ज्ञानेश्वर बाऊस्कर हे टेकडीवर उभे होते. त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज पडल्याने ते टेकडीवरून खाली कोसळले त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अशी माहिती सोबत असलेल्या नागरीकांनी दिली. याची माहिती मिळताच पोलीस पाटील राजरत्न आढळे, सरपंच नवाज तडवी, तलाठी वसीम तडवी, दिलीप तायडे आदींनी धाव घेतली. मृतदेह तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला आहे. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरूष गेल्या हळहळ व्यक्त होत आहे.

न्हावीतही गुराख्यावर काळाचा घाला

फैजपूर । तालुक्यातील न्हावी शिवारात देखील गुरे चारण्यासाठी गेलेल्या हमीद रूबाब तडवी यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. हमीद तडवी हे न्हावी शिवारातील जानोरी जंगलात खारबर्डी धरणाच्या पाटचारीजवळ शुक्रवारी गुरे चराईसाठी गेल्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास तहान लागल्याने पाटचारीत पाणी पीत असतांना त्यांच्या पायाजवळ वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेल्या व्यक्तीने ओरडा-ओरड केल्याने परीसरातील शेतकरी व मजूर जमा झाले. त्यांनी तातडीने त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार राजेश बर्‍हाटे, श्रीकांत इंगळे करीत आहे. मयताच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परीवार आहे.

निमखेडीच्या शेतकर्‍याचा हरताळा शिवारात मृत्यू

मुक्ताईनगर । तालुक्यातील निमखेडी खुर्द येथील अजय रुस्तम घोडकी (वय 40) हे हरताळा शिवारातील शेतामध्ये काम करत असताना अचानक पावसाचे वातावरण झाले,अवघ्या काही मिनिटातच आकाशात प्रचंड विजा कडाडू लागल्या त्यातच त्यांच्या अंगावर अडीच वाजेच्या सुमारास वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. किशोर रामदास जगताप यांनी दिलेल्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मयताच्या पश्चात आई, पत्नी , एक मुलगा व विवाहित मुलगी असा परिवार आहे.

तहसीलदार मात्र अनभिज्ञ...

एका शेतकर्‍याचा वीज पडून आकस्मात मृत्यू होतो या संदर्भात तहसीलदार व महसूल प्रशासन मात्र अनभिज्ञ असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मयताच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी अथवा सांत्वन करण्यासाठी महसूल प्रशासनातर्फे कुणीही भेट दिली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

वाळूचे ट्रॅक्टर डंपर पकडण्यासाठी रात्री बारा एक वाजेला सज्ज असलेल्या महसूल विभागाला नैसर्गिक आपत्ती बाबत माहिती नसल्याने तसेच नैसर्गिक आपत्तीच्या ठिकाणी जाण्यास वेळ मिळत नसल्याबद्दल नागरिकातून खेद व्यक्त केला जात आहे.यासंदर्भात तहसीलदार यांची संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तहसीलदारांची संपर्क होऊ शकला नाही. घटनेची माहिती कळताच आ. चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय गाठून मयत शेतकर्‍याच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

चिंचखेड प्रगणे येथे महिलेचा मृत्यू

बोदवड । तालुक्यातील चिंचखेड प्रगणे येथील शेतात कापूस वेचणार्‍या महिलेच्या अंगावर विज पडल्याने जागीच ठार झाली आहे. मृत महिलेचे नाव पार्वता गोपाळ भिल असून सदरील महिलेचे गेल्या सहा महिन्या अगोदर लग्न झाले होते. नवलसिंग सुरतसिंग पाटील यांच्या शेतात साधारणत: दहा महिला कापूस वेचायला आल्या होत्या. दुपारी सुट्टी होण्याच्या सुमारास विजांचा कडकडाट व पाऊस सुरु झाल्याने सर्व दहा महिला एका झाडाखाली थांबल्या. यादरम्यान झाडावर विज कोसळल्याने पार्वता गोपाल भिल महिलेचा मृत्यू, सुनंदा गजानन भिल या महिलेची प्रकृती गंभिर तर वैजंता सुभाष भिल जखमी झाल्या आहेत. यावेळी बोदवड ग्रामीण रुग्णालयात आमदार चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com