गुलाबरावांना पुन्हा टपरीवर बसवू!

शिवसेनेच्या मेळाव्यात खा. राऊतांची टीका
गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटील

जळगाव- jalgaon प्रतिनिधी

एकनाथ शिंदेंच्या बंडात (rebellion of Eknath Shinde) जिल्ह्यातून शिवसेनेचे चार आणि एक अपक्ष असे पाच आमदार सहभागी असल्याने राज्याच्या राजकारणात जळगाव जिल्हा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. जळगाव जिल्ह्यातील दोघा आमदारांमध्ये झालेली कथित बाचाबाची (alleged altercation between the two MLAs )आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांना पुन्हा टपरीवर बसवण्याची (fit on the tapir) केलेली भाषा आज चर्चेत राहिले.

शिंदेंच्या बंडात चिमणराव पाटील, किशोरआप्पा पाटील, लता सोनवणे हे तीन आमदार पहिल्या दिवसापासून सहभागी होते. दोन दिवस पक्ष निष्ठेची माळ जपल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील हे देखील शिंदे यांच्या गटात गेले. जिल्ह्यातील सामान्य शिवसैनिकांमध्ये या बंडा बाबत कमालीची अस्वस्थता असली तरी जिल्हाप्रमुख आणि बरेचसे प्रमुख पदाधिकारी सोयीची भूमिका घेताना दिसत आहेत. संभाव्य मंत्रीपदावरून शिंदे गटात गेलेल्या जिल्ह्यातील दोन आमदारांमध्ये गुवाहाटी मधील हॉटेल मध्ये बाचाबाची झाल्याची जोरदार चर्चा आज सोशल मीडिया रंगली होती. मात्र याबाबत कोणताही दुजोरा मिळू शकला नाही. हे दोन आमदार कोण याबाबत तर्क-वितर्क केले जात होते. बंडखोरांबाबत बाबत शिवसेनेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. खा.संजय राऊत यांनी आज दहिसर येथे बंडखोरांवर चांगलेच तोंडसुख घेतले. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या बाबत एकेरी बोलत, आपणच एकमेव शिवसेनेचे वाघ आहोत असे दाखवणारे पळून गेलेत, टपरीवर बसणाऱ्यांना शिवसेनेने कॅबिनेट मंत्री केले असे म्हणणाऱ्यांना पुन्हा पानटपरीवर बसायला लावू अशी टीका खा. राऊत यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com