पाऊस पाणी चांगला होऊन बळीराजा सुखी होऊ दे - आ. गिरीष महाजन

विठुरायाच्या गजराने दुमदुमली प्रति पंढरपूर नगरी..लाखो भाविकांनी घेतले दर्शन ...
पाऊस पाणी चांगला होऊन बळीराजा सुखी होऊ दे - आ. गिरीष महाजन

शेंदुर्णी, (Shendurni) ता. जामनेर

विठुरायाच्या प्रत्यक्ष भेटीसाठी प्रति पंढरपूर शेंदुर्णी (Shendurni) नगरीमध्ये लाखो भाविकांचा जनसागर लोटला. कोरोना (Corona) महामारीच्या निर्बंधानंतर दोन वर्षांनी विठुरायाच्या जय जय काराने आसमंत दुमदुमलेल्या प्रति पंढरपूर नगरी बघून अनेक भाविक भक्त भावूक झाले.

पाऊस पाणी पीक मुबलक होऊन बळीराजा सुखी होऊ दे, जनतेला चांगले आरोग्य लाभु देण्याचे साकडे माजी मंत्री आ.गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी श्री त्रिविक्रमाला (Sri Trivikramala) घातले.

आषाढी एकादशी निमित्त रात्री बारा वाजता येथील भगवान श्री त्रिविक्रम महाराजांच्या मूर्तीची शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत महापूजा अभिषेक आणि महाआरती माझी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन आणि जामनेर नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. साधना महाजन, शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय गरुड व जि. प. सदस्या सौ सरोजिनी गरुड , शेंदुर्णीच्या प्रथम नागरिक सौ. विजया खलसे व पंडित दीनदयाल पतसंस्थेचे चेअरमन अमृत खलसे ,ममता हॉस्पिटलचे संचालक डॉ चेतन अग्रवाल व सौ डॉ . पूजा अग्रवाल , उद्योजक पवन अग्रवाल व सौ पूर्वा अग्रवाल विकास बोरोले, प्रमोद बोरोले , पवन सूर्यवंशी व सौ. सपना सूर्यवंशी, संत कडोजी महाराज संस्थानचे गादीवारस हभप शांताराम महाराज भगत व सौ. शारदा भगत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी शास्रोक्त मंत्रोच्चार श्री त्रिविक्रम मंदिराचे पुजारी व विश्वस्त शिरीष भोपे, भूषण देवकर, अरुण जोशी, विजय पाठक, जयवंत पिसे, ज्ञानेश जोशी, देवेंद्र पाडळकर, या ब्राह्मण वृंदांनी मंत्रोच्चार केला.

पुजेप्रसंगी न.पं. मुख्याधिकारी साजीद पिंजारी, भाजपचे नेते गोविंद अग्रवाल, प्रकाश झवर, श्रीमती कुमुदिनी साने, उपनगराधक्ष निलेश भोरात गावातील इतर मान्यवर उपस्थीत होते.

भगवान श्री त्रिविक्रमाच्या महाआरतीनंतर रात्री बारा वाजेपासूनच भाविकांनी दर्शनासाठीलांबच लांब रांगा लावल्या होत्या. पहाटेपासूनच शेंदुर्णी पंचक्रोशीतील भाविक भक्त दिंडी व पालख्यांसह दर्शनासाठी गर्दी केली होती. रांगेत उभे असलेल्या भाविकांनी विठुरायाचा जयघोष करत मंदिर परिसर दणानुन सोडला. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविक भक्तांच्या रांगा होत्या.

ठिकठिकाणी फराळाचे वाटप

शेंदुर्णी येथील विविध सहकारी संस्था व सामाजिक संघटना मंडळातर्फे दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांसाठी साबुदाणा खिचडी, फराळ, केळी दूध चहा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये सहकारी पतसंस्थांमध्ये राणी लक्ष्मीबाई पतसंस्था, आचार्य गरुड पतसंस्था, पारस जैन पतसंस्था, मौलाना आझाद पतसंस्था , यासह इतर सहकारी पतसंस्था होत्या.सामाजिक संघटनांमध्ये आदर्श तरुण मित्र मंडळ, सातउंबर येथील माधव बाबा संस्थान, विठाई प्रतिष्ठान रेल्वे स्टेशन, तसेच रासयोतर्फे पादत्राणे सांभाळण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती.

पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त

येथील पहुर पोलीस स्टेशनच्या वतीने पी. आय. प्रताप इंगळेच्या मार्गदर्शना खाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. यावेळी पहुर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि जिल्ह्यातुन पोलीस कुमक ५० जणांची तुकडी तैनात करण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com