वराडसिम रस्त्यावर बिबट्याचे दर्शन?

वराडसिम रस्त्यावर बिबट्याचे दर्शन?

सुनसगाव,Sunsagaon ता. वार्ताहर

येथून जवळच असलेल्या बेलव्हाळ गावानजीक (Belval village) बिबट्या (Leopard) सदृश्य प्राणी महिलेला दिसल्याने (seen) गावात भितीचे वातावरण (atmosphere of fear) निर्माण झाले आहे .

या बाबत माहिती अशी की, बेलव्हाळ येथील वार्ड क्र. तीन वराडसिम रस्त्याच्या बाजूला शेती शिवाराकडून गावाकडे बिबट्या सदृश्य प्राणी येत असल्याचे लक्षात आल्यानंतर शौचास गेलेल्या महिलेला दिसल्याने व याच वेळी कुत्र्यांनी जोरजोरात भुंकणे सुरू करून कुत्र्यांची पळापळ सुरू झाल्याने गावातील तरुणांनी घटनास्थळाकडे धाव घेतली असता सदरचा प्राणी शेती शिवारात पळून गेल्याचे दिसले.

गेल्या काही महिन्यांपूर्वी याच गावाला लागूनच असलेल्या मराठी शाळेच्या जवळच बिबट्याने गाय फस्त केली होती तसेच गायीचे वासरू नेले होते. त्यानंतर दोन तीन वेळा बिबट्याने गावात घुसण्याचा प्रयत्न केला होता मात्र ग्रामस्थांच्या जागृत पणामुळे बिबट्या काही दिवसांपासून गायब झाला होता मात्र दि. 16 रोजी सायंकाळी 7 वाजे च्या सुमारास बेलव्हाळ येथील आदिवासी वस्तीत बकरी व गायी, म्हशी बाहेर बांधलेल्या असल्याने भक्ष्य पकडण्यासाठी आल्याचे बोलले जात आहे.

या बाबत बेलव्हाळ येथील किरण शिंदे यांनी माहिती दिली असून ग्रामस्थांनी सतर्क राहावे असे आवाहन पोलीस पाटील, सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी केले असून या भागात बिबट्या तसेच तडस तसेच जंगली प्राणी असल्याचे वनविभागाच्या अधिकार्‍यांनी दुजोरा दिला आहे. काही दिवसांपूर्वी गायीचा फडशा पाडणारा प्राणी बिबट्या असल्याचे वनविभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले होते.

पुन्हा बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन झाल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी वनविभागाच्या अधिकार्‍यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी करून ग्रामस्थांची भिती दूर करण्यासाठी प्रयत्न करावे अशी चर्चा बेलव्हाळ परिसरात सुरू आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com