
चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी
तालुक्यातील पिलखोड जवळ चाळीसगाव-मालेगाव (Chalisgaon-Malegaon) रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत (accident) बिबट्याचा (Leopard) मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. जखमी बिबट्याला जेरबंद करुन, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वनविभागाने शर्तीचे प्रयत्न केले. परंतू अखेर त्यांना बिबट्या मृत अवस्थेतच मिळुन आला. त्यामुळे बिबट्याला वाचविण्यासाठी त्यांचे प्रयत्न निफळ ठरले. याप्रकरणी पोलीस स्टेशनला अज्ञात वाहनाविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील पिलखोड शिवारात चाळीसगाव - मालेगाव रस्त्यावर बिबट प्राणी अज्ञात वाहनाच्या धडकेने जखमी अवस्थेत असल्याची माहिती वनरात्री ८:३० च्या सुमारास वनपरिक्षेत्र कार्यालय चाळीसगाव यांना प्राप्त झाली. तात्काळ सर्व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट प्राणी रस्त्यालगत असलेल्या वाल्मिक पुंडलिक पवार यांच्या मका पिकाच्या शेतात जखमी अवस्थेत असल्याचे आढळून आले.
बिबट प्राणी उपचारासाठी जेरबंद करण्यासाठङ वनकर्मचारी यांचेकडून सलग ०६ तास शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. परंतु सदर बिबट वनकर्मचारी यांचेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता. अखेरीस या बिबट प्राण्यास जेरबंद करतांना रात्री ३ वाजेच्या सुमारास तो मक्याच्या शेतात मृत अवस्थेत आढळून आला. बिबट्याची तपासणी करुन पशुवैद्यकीय अधिकारी श्री. भट यांनी त्यास मृत घोषित केले. बिबट प्राण्याचे शवविच्छेदन पूर्ण करून शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आला. याप्रसंगी पोलीस निरीक्षक मेहुणबारे श्री.आव्हाड व पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते. याप्रकरणी पोलीस स्टेशनला अज्ञात वाहना चालका विरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई उपवनसंरक्षक जळगाव विवेक होशिंग, सहा. वनसंरक्षक जळगाव सुदर्शन शिसव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती शितल नगराळे, मानद वन्यजीव रक्षक विवेक देसाई, राजेश ठोंबरे, जि. एस. पिंजारी, आर. व्ही. चौरे, श्री. जाधव, एस.बी. चव्हाण, वाय. के. देशमुख, के. बी. पवार, आर. आर. पाटील, आर. बी. पवार, सी. व्ही. पाटील एम. पी. शिंदे, एस. एच. जाधव, ए. एन. महिरे, अमित पाटील, एस. एच. जाधव, बाळू शितोळे, भटू अहिरे, श्रीराम राजपूत, दिनेश कुळकर्णी, राहुल मांडोळे, समाधान मराठे यांच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आली.