स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यावल येथे कायदेविषयक शिबिर

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यावल येथे कायदेविषयक शिबिर
USER

जळगाव - jalgaon

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्यानिमित्त नागरिकांमध्ये शासकीय योजना, कायदेविषयक जनजागृती होण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा वकील संघ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालय, यावल येथे शुक्रवार, 12 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी पाच या कालावधीत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए.ए.के.शेख यांनी दिली आहे.

या शिबिराचे उद्धाटन सकाळी 10.30 वाजता होणार असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव न्या. एस. डी. जगमलानी हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष दिलीप बोरसे आदी उपस्थित राहणार आहेत.

याठिकाणी शासनाच्या विविध विभागांचे स्टॉल लावण्यात येणार असून यामार्फत शासनाच्या योजनांची माहिती नागरीकांना देण्यात येणार आहे. त्याचबरोबर येथे कोविड प्रतिबंधक लसीकरणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या शिबिराचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सचिव ए.ए.के.शेख यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com