
जळगाव - jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University) आजीवन अध्ययन व विस्तार विभागाद्वारे ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी’ यांच्या नावाने दर महिन्याला व्याख्यानमाला सुरू करण्यात आली असून बुधवार दि.२३ मार्च रोजी अभिनेत्री सुरभी हांडे (Surabhi Hande) यांचे ऑनलाईन व्याख्यान (Online lectures) होणार आहे.
२३ मार्च रोजी दुपारी ४ वाजता अभिनेत्री सुरभी हांडे ह्या ‘ग्रामीण महाराष्ट्रातील प्रतिभा’ या विषयावर त्या बोलणार आहेत. झुम-लिंक, युट्युब, फेसबुक (Zoom-Link, YouTube, Facebook) वर हे व्याख्यान ऐकता येईल.
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर व्याख्यानाची लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. व्याख्यानमालेस श्रोत्यांनी ऑनलाईन उपस्थित राहण्याचे आवाहन आजीवन व अध्ययन व विस्तार विभागाचे प्रभारी संचालक प्रा.मनिष जोशी (Prof. Manish Joshi) यांनी केले आहे.