जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी उद्या आरक्षण सोडत

गटांची जिल्हास्तरावर तर गणांची तालुकास्तरावर प्रक्रिया
जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी उद्या आरक्षण सोडत

जळगाव । Jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) गटरचनेनंतर प्रतिक्षा लागून असलेल्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम उद्या दि. 28 जुलै रोजी होणार आहे. जिल्ह्यातील 77 गट व 154 गणांसाठी हे आरक्षण सोडत होईल. गटांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय (Collector's Office) तर गणांसाठी तालुकास्तरावर सोडत काढण्य ात येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) 77 गटांसाठी उद्या 28 रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांच्या अध्यक्षतेखाली सोडत निघणार आहे. तसेच 154 गणांसाठी प्रत्येक तालुकास्तरावर गणसंख्येनुसार तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता सोडत काढण्यात येणार आहे. ओबीसीसह आरक्षण होणार असल्याने गेल्या पंचवार्षीक प्रमाणेच स्थिती असणार आहे. यात दहा गट वाढल्याने प्रत्येक जातीनुसार किमान दोन ते तीन संख्येची भर पडणार आहे. जिल्ह्यातील लोकसंख्या, गटातील ओबीसीची संख्या यानुसार ओबीसीच्या 17 जागांवर आरक्षण निघण्याची शक्यता आहे.

सन 2017 मध्ये असे होते आरक्षण

सन 2017 मध्ये जिल्हा परिषदेच्या 67 जागा होत्या. त्यात सर्वसाधारण एकूण 32 (स्त्री राखीव 16 व सर्वसाधारण 16), नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण जागा 18 ( स्त्री राखीव 9, पुरूष 9), अनुसुचित जमाती एकूण जागा 11 ( स्त्री राखीव 6, पुरूष 5), अनुसुचित जाती एकूण जागा 6 ( स्त्री राखीव 4, पुरुष 2).

याठिकाणी होईल आरक्षण सोडत

जळगाव : सर्व 77 जि. प. गट नियोजन भवन, जळगाव तालुका गण : पंचायत समिती सभागृह, एरंडोल : डीडीएसपी कॉलेज म्हसावद रोड, धरणगाव : प्रशासकीय तहसील कार्यालय, जामनेर : पंचायत समिती सभागृह, भुसावळ : पंचायत समिती सभागृह, बोदवड : तहसील कार्यालय, रावेर : तहसील कार्यालय, यावल : तहसील कार्यालय, पाचोरा : अल्पबचत सभागृह भडगाव रो़ड, चाळीसगाव : सिद्धीविनायक हॉल, करगाव रोड, भडगाव : पंचायत समिती सभागृह, अमळनेर : इंदिरा भवन स्टेट बँकेमागे , पारोळा : नवीन प्रशासकीय इमारत, कासोदारोड, चोपडा : पंचायत समिती सभागृह,

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com