जाणून घ्या जैन तीर्थकरांच्या जीवनातील कल्याणकारी पंचकल्याणक

मांगीतुंगीजी येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव
जाणून घ्या जैन तीर्थकरांच्या जीवनातील कल्याणकारी पंचकल्याणक

पारोळा Parola

कुसुंबा जवळील 80 किमी अंतरावर असलेले जैन (Jain) धर्मियांचे पवित्रक्षेत्र (Sacred area) मांगीतुंगीजी (Mangitungi) येथे 11मे ते 15 मे पर्यंत 26 त्यागी वृदांच्या उपस्थितीत आचार्य वसूनंदीजी सहसंघ तसेच प.पू. तीर्थनंदीजी महाराज सहसंघाच्या सानिध्यात पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव (Panchkalyanak Prestige Festival) संपन्न होत असल्याची माहिती कुसुंबा (Kusumba) क्षेत्राचे विश्वस्त व खानदेश जैन समाजाचे प्रसिद्ध प्रमुख सतीश वसंतीलाल जैन यांनी दिली .

पंचकल्याणक (panchakalyanak) हे जैन तीर्थंकरांच्या जीवनातील कल्याणकारी क्षणातील गुणविशेष असून त्यात तीर्थंकरांच्या पवित्र जीवनाचे (holy life of Tirthankaras) दर्शन झाल्याने मानव समाजात त्यांच्या उपदेशाचा अवलंबून करून मोक्षमार्गाकडे प्रवृत्त होण्याची प्रेरणा प्राप्त होते आणि मनुष्य अध्यात्मिक विकासाकडे (Towards spiritual development) जाण्यास गतिशील होते.

पवित्र पंचकल्याणक याप्रमाणे असते -

●गर्भ कल्याणक - (Fetal welfare)

भगवान जेव्हा मातेच्या गर्भात येतात तेव्हा सहा महिन्या आधीपासून देवलोक आकाशातून रत्न व इतर मौल्यवान पदार्थांची वर्षा करतात मातेला रात्रीच्या उत्तरार्धात पुढील प्रमाणे 16 स्वप्ने दिसतात

1) शुभ लक्षण असलेला पांढरा ऐरावत हत्ती 2) भव्य पांढरा बैल 3) लक्ष्मीदेवी 4) सुवासित पुष्पांच्या माळेची जोडी 5) पूर्ण असलेला चंद्र 6)उगवता सूर्य 8) सोन्याच्या कमळाने भरलेले पात्र 9) स्वर्ण जलात क्रिडा करत असलेले मासे 10)स्वर्णिम जलाने भरलेले मोठे सरोवर 11) लाटा उफाळत असलेला समुद्र 12) रत्नजडित असलेले सिंहासन 13) मोठे असलेले दिव्य महल 14)नागेंद्र चे भवन 15)ज्योतिर्मय असलेली रत्नराशी 16) धूर विरहित प्रज्वलित अग्नी

●जन्म कल्याणक - (Birth welfare)

भगवंतांचा जन्म होतो तेव्हा इंद्राचे सिंहासन हलते वृक्ष आणि वेलीं यांना सहा ऋतूमध्ये येणारे फळे व फुले येतात. रत्नांची वर्षा होते इंद्र पृथ्वीवर येतात इंद्राणी नवजात बाळाला घेवुन इंद्राजवळ देते इंद्र नवजात बाळाला ऐरावत हत्तीवर बसवून पर्वतावर घेवून जातो तेथे त्याचा एक हजार कलशांनी स्थान करतात परत येतांना त्या बाळाचे अंग पुसताना इंद्र एक हजार नेत्रांनी भगवंतांची सुंदरता पाहतो परंतु इंद्राचे पाण्याची तृप्ती होत नाही .

तप किंवा दीक्षा कल्याणक - (Tap or Diksha Kalyanak)

भगवान युवक झाल्यावर राज सिहांसनावर बसतात आणी धर्मानूकुल अशा राजतंत्राचे संचालन करतात राज्यकालच्या कित्येक वर्षांनंतर भगवंतांचा वैराग्य काल आता जवळ आलेला पाहून इंद्रलोकातून इंद्र-पूजनाची सामुग्री घेवुन इंद्र व इतर देवता व देवंगना एके दिवशी राज्यसभेत उपस्थित होतात आणि भावनेपूर्वक भगवंतांची पूजा करतात नंतर इंद्राच्या पूर्व सूचनेनुसार इंद्रलोकातील सर्वात श्रेष्ठ सुंदरी, देवांगना ,निलांजना राज्यसभेत भावपूर्ण नृत्यास आरंभ करतात आणि नृत्य करता - करता मुच्छित होतात तसेच मृत्यू पावतात निलांजनाच्या मृत्यूमुळे भगवंताना संसारातून वैराग्य येते आणि ते सर्वांना सूचित करतात व वनात निघून जातात.

●ज्ञान कल्याणक - (Knowledge Welfare)

तपश्चर्या करतांना अशोक वृक्षाखाली ध्यान मुद्रेत असतांना त्यांना ज्ञान प्राप्त होते देवगण एके दिवशी समवशरणाची रचना करतात रत्नजडीत असलेल्या सिहांसनावर सोन्याचे कमळ असते त्या कमळावर भगवंत विराजमान होतात आणि सर्व जीवांना कल्याणाचा उपदेश करतात.

● मोक्षकल्याणक -. (Mokshakalyanak)

जेव्हा भगवंतांना मोक्ष प्राप्त होत असतो तेव्हा चारीही बाजूंना प्रकाश असतो आणि मन वचन काय यांच्या प्रभावाला नष्ट करून शुक्ल- ध्यानाच्या मुद्रेत नखे आणि केस सोडून भगवंतांचे संपूर्ण शरीर निर्वाण प्राप्त करते .

.

Related Stories

No stories found.