गावठी कट्टयाने दहशत पसरवणारा आरोपी ताब्यात

एलसीबीची वरणगावात कारवाई
गावठी कट्टयाने दहशत पसरवणारा आरोपी ताब्यात
संशयित आरोपी सोनू तायडे

भुसावळ - प्रतिनिधी Bhusawal

तालुक्यातील वरणगाव (varangaon) शहरात गावठी कट्टा ने दहशत माजवणाऱ्या आरोपींच्या मुसक्या एलसीबी (Lcb) च्या पथकाने आवळल्या आहे. ही कारवाई 6 रोजी करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव शहरात गावात त्याने दहशत माजविणाऱ्या यश ऊर्फ ( सोनु ) युवराज तायडे (वय 19, रा.प्रतिभा नगर चौक वरणगाव ) याचा एलसीबी पथकाकडून शोध घेण्यात येत होता. दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित आरोपी शहरातील प्रतिभा नगर चौक परीसरात सार्व. गैरकायदा गावठी कट्टा ताब्यात बागळुन दहशत माजवत असल्याची गुप्त माहीती मिळताच

पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, एलसीबीचे पोलीस निरीक्षक सो किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी च्या पथकातील सफौ. अशोक महाजन, हे.कॉ दिपक पाटील, हे.कॉ लक्ष्मण पाटील, पो.ना किशोर राठोड, पो.ना रणजित जाधव, पो.ना श्रीकृष्ण देशमुख, पो.कॉ विनोद पाटील, पो.कॉ ईश्वर पाटील, चालक हे.कॉ राजेंद्र पवार यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत संशयित आरोपी सोनू तायडे याला ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून वीस हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला असून त्याला वरणगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याबाबत वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास वरणगाव पोलिस करीत आहे.

Related Stories

No stories found.