आज धुळ्यात वकील लाल फिती लावून मनपाचा करणार निषेध

नागरी प्रश्नांसाठी वकील आक्रमक, महिनाभरात सुविधा पुरवा अन्यथा नोटीस बजावणार
आज धुळ्यात वकील लाल फिती लावून मनपाचा करणार निषेध

धुळे dhule। प्रतिनिधी

शहरात नियमित कर (regular tax) भरूनही नागरिकांना सुविधा (Facilities for citizens) मिळत नाही. रस्ते, गटारी, अस्वच्छता व पाण्याचा प्रश्न (issue of sanitation and water) गंभीर झालेला आहे. विविध पक्ष, संघटना व नागरिकांकडून आंदोलने (Protests by citizens) करून देखील याची दखल घेतली (Not noticed.) गेली नाही. त्यामुळे आता या प्रश्नांसाठी वकील आक्रमक (Lawyer aggressive) झाले आहे. त्यांनी या समस्यांना वाचा फोडण्याचा निर्धार काल बैठकीत केला. त्यानुसार 7 नोव्हेंबरला झोपेचे सोंग घेतलेल्या मनपा प्रशासनाचा (Municipality administration) लाल फिती लावून (Red tape protest) निषेध केला जाईल. समस्या सोडवण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली जाईल. त्यानंतरही समस्या सुटल्या नाही तर जिल्हाधिकारी, आयुक्तांना नोटीस देण्यात येणार असल्याचे बैठकीत जाहिर करण्यात आले.

आज धुळ्यात वकील लाल फिती लावून मनपाचा करणार निषेध
महिलेचा विनयभंग केल्यानंतर तरुणाचे विष प्राशन

यावेळी वकील संघाचे अध्यक्ष आर.डी. जोशी अध्यक्षस्थानी होते. अ‍ॅड.मधुकर भिसे, अ‍ॅड.दिनेश गायकवाड, अ‍ॅड.पुरुषोत्तम महाजन, अ‍ॅड.रसिका निकुंभ, अ‍ॅड.एम.एस. पाटील, अ‍ॅड.कुंदन पवार, अ‍ॅड. रमेश सोनवणे, अ‍ॅड. विलास झाल्टे, अ‍ॅड.श्यामकांत पाटील आदी उपस्थित होते. रस्त्यांची दुरवस्था झाल्याने अंगदुखी जडली आहे. पाणी वेळेत मिळत नाही. त्यामुळे झोपेचे सोंग घेणार्‍यांच्या मागे लागल्याशिवाय कामे होणार नाही, असे यावेळी उपस्थित वकिलांनी व्यक्त केले.

आर.डी. जोशी म्हणाले की, जिल्हाधिकारी व मनपा प्रशासनाच्या विरोधात सोमवारी लाल फिती लावून निषेध करू. त्यानंतर समस्या सोडवण्यासाठी यंत्रणेला एक महिन्याचा वेळ दिला जाईल. त्यानंतरही समस्या सुटल्या नाही तर नोटीस व कायदेशीर मार्गांचा अवलंब केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आज धुळ्यात वकील लाल फिती लावून मनपाचा करणार निषेध
पाचशे निराधार, विधवा महिलांना साडीचा आहेर
आज धुळ्यात वकील लाल फिती लावून मनपाचा करणार निषेध
PHOTOS # जखम डोक्याला, मलमपट्टी पायाला..!

अ‍ॅड. राहुल पाटील म्हणाले, सुविधांसाठी आंदोलन करण्यासाठी नागरिकांनाही शिक्षित कसे करता येईल, याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तर ढिम्म प्रशासनातील सर्वांनी झोपेचे सोंग घेतले आहे. शहर स्वच्छ-सुंदर करण्याचे स्वप्न दाखवणे हा केवळ जुमला होता, असे अ‍ॅड. कुंदन पवार म्हणाले.

तर अ‍ॅड.रसिका निकुंभ यांनी नागरी समस्यांबद्दल काही दिवसांपूर्वीच महिलांनी पुढाकार घेतला आहे. आता एकत्र रस्त्यावर यावे लागेल असे सांगितले.

आज धुळ्यात वकील लाल फिती लावून मनपाचा करणार निषेध
केळीचे सर्वाधिक उत्पन्न घेण्यात तळवे गाव प्रथम

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com