टीईटी घोटाळा प्रकरणात वकिलाला अटक

गोलाणीतील बालाजी जॉब प्लेसमेंटमध्ये पथकाची झाडाझडती
न्यूज अपडेट/News Update
न्यूज अपडेट/News Updateन्यूज अपडेट/News Update

जळगाव । jalgaon

राज्यभर गाजलेल्या टीईटी घोटाळा (TET scam) प्रकरणात पुणे पोलिस जळगावात आहे. त्यांनी आज दुपारी गोलाणी मार्केटमधील बालाजी जॉब प्लेसमेंटच्या कार्यालयात (Balaji Job Placement) झाडाझडती घेतली. तसेच या संस्थेचे संचालक अ‍ॅड. विजय दर्जी यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या वृत्ताला पुणे सायबरच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दुजोरा दिला आहे.

शहरातील गोलाणी मार्केटमध्ये असलेल्या बालाजी जॉब प्लेसमेंट या संस्थेच्या माध्यमातून बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाते. आता पर्यंत बर्‍याच बेरोजगारांना ऑनलाइन जॉबचे आमिष दाखवुन त्यांची फसवणूक झाली आहे.

तसेच राज्यभर गाजलेल्या टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे जळगाव जिल्ह्यात पोहोचल्यानंतर जळगावचे नाव पुन्हा राज्यभर गाजले होते. त्यावेळी सर्वात अगोदर चाळीसगाव मधून काही जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता जळगावातील बालाजी जॉब प्लेसमेंटचे अ‍ॅड. विजय दर्जी यांच्या कार्यालयात झाडाझडती घेण्यात आली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पथक पुण्याकडे रवाना झाले आहे.

चौकशी नंतर होणार कारवाई

आतापर्यंतच्या तपासात अ‍ॅड. विजय दर्जी यांचे मोबाईल कॉल डिटेल्स, ऑनलाइन व्यवहार, मेल यासह इतर तांत्रिक पुराव्याच्या आधारावर दर्जी यांचे नाव या प्रकरणात समोर आले होते. त्याच्या आधारावर त्यांची चौकशी केली जात आहे. या चौकशीत काय निष्पन्न होते, त्यानुसार पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती भाग्यश्री नवटके यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com