भुसावळ पालिकेची शेवटची सभा सोमवारी: 264 विषय अजेंड्यावर

भुसावळ पालिकेची शेवटची सभा सोमवारी: 264 विषय अजेंड्यावर
USER

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

पालिकेची (Municipality) रखडलेली सर्वसाधारण सभा (meeting) पाच महिन्यांनंतर सोमवारी 27 रोजी सकाळी 11 वाजता निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये शहरातील प्रत्येक विभागातील गल्ली बोळचे रस्ता काँक्रिटीकरण करणे, पेव्हर ब्लॉक बसविणे तसेच उद्यान विकसित करणे यासह 264 विषय मंजुरीसाठी (Subject approval) ठेवले आहेत.

पालिकेची निवडणुकीपूर्वीच हि शेवटची सर्वसाधारण सभा लक्षवेधी ठरणार आहे. रस्त्यामुळे त्रस्त झालेल्या भुसावळकरांना दिलासा मिळणार असून शहरातील जवळपास सर्व प्रभागातील रस्ते काँक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक बसविणे याशिवाय भुयारी नालीचे बांधकाम करणे हे विषय प्राथमिकतेवर घेण्यात आले आहे.

शहरातील वाढती गुन्हेगारी आळा बसावा याकरिता शहरातील प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे हे विषयी अजेंड्यावर आहे. याशिवाय बंद पडलेल्या ठिकाणी एलईडी लाईट लावणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी बेंच बसविणे यांनाही या विषयांनाही प्राथमिकता देण्यात आलेली आहे.

पालिकेचा या पंचवार्षिक कार्यकाळ 28 डिसेंबरला संपत असून त्यापूर्वीची ही अखेरची सर्वसाधारण सभा राहणार असल्यामुळे प्रत्येक प्रभागाला न्याय मिळावा या दृष्टिकोनातून त्या-त्या प्रभागाचे विषय अजेंड्यावर घेण्यात आलेले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंद पडलेली गोपाळ पोलीस चौकी परिसराचे सुशोभीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण विषय अजेंड्यावर आहे. भूमिगत गटार बांधणे विविध भागांमध्ये सबमर्सिबल पंप बोरवेल करणे या विषयावरही चर्चा होणार आहे.

आरोग्य सुदृढ राहावे याकरिता महिला व पुरुषांसाठी जिम साहित्य खरेदी करणे, विविध क्रीडा साहित्य खरेदी करणे महिलांसाठी ओपन जिम बनविणे ओपन स्पेस जागेला विकसित करणे उद्यानला सुशोभिकरण करणे या शिवाय दुभाजक, मुख्य चौकाचे सुशोभिकरण करण्यावर सभेत भर देण्यात आले आहे. विविध समाज बांधवांसाठी सामाजिक सभागृह बांधणे तसेच काही ठिकाणी जुने जीर्ण झालेले पुल तोडून त्या ठिकाणी नवीन पूल बांधणे संरक्षण भिंत बांधणे तसेच योग्य त्या ठिकाणी लोखंडी जाळी बसवणे हे विषयी अजेंड्यावर घेण्यात आले आहे,

शहरात आरोग्य सुदृढ व्हावे या दृष्टिकोनातून पालकमंत्री चषक स्पर्धा, आमदार मॅरेथॉन स्पर्धा, स्वर्गीय निखिल खडसे फेस्टिवल, तसेच नगराध्यक्ष चषक स्पर्धेचे आयोजन या विषयांवर प्रथमच सर्वसाधारण सभेत घेण्यात आले असून या विषयामुळे नक्कीच शहरात क्रीडा वातावरण निर्माण होईल व खेळाडू मैदानाकडे वळतील.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com