भाषेची अस्मिता आणि संस्कृती वृध्दींगत व्हावी - प्रा. डॉ. के. के. अहिरे

भाषेची अस्मिता आणि संस्कृती वृध्दींगत व्हावी - प्रा. डॉ. के. के. अहिरे

जळगाव : jalgaon

मराठी भाषेच्या (Marathi languages) अभिमानासोबतच इतर भाषांचा आदर करावा. भारत (India) हा विविधतेने नटलेला देश असून काही इतर भाषेतील (languages) शब्द स्विकारताना देखील आपल्याच भाषेचा अट्टाहास धरु नये, भाषा समृद्ध करण्यासाठी (enrich) भाषिक देवान-घेवाण होणं आवश्यक आहे. भाषा संक्रमनातून जात असताना तीची अस्मिता (Asmita) आणि संस्कृती लयास न जाता ती अधिक वृध्दीगत (Augmented) व्हावी असे प्रतिपादन पी. ओ. नहाटा महाविद्यालयातील (P. O. Nahata College) मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. के.के. अहिरे (Prof.Dr. K.K. Ahire) यांनी केले.

सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करणार्‍या नूतन मराठा महाविद्यालयात ( Nutan Maratha College) मराठी विभागातर्फे आयोजित मराठी भाषा (Marathi Language) गौरव दिनाच्या (Pride Day) कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य प्रा. राजेंद्र देशमुख, मराठी विभाग प्रमुख तथा कार्यक्रमाच्या संयोजिका प्रा. ललिता हिंगोणेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानपीठकार तथा नटसम्राट (Natsamrat) नाटककार कुसुमाग्रज (Kusumagraj) यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण करुन करण्यात आली. याप्रसंगी मराठी विभागाच्या वाङमय मंडळाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

पुढे बोलतांना प्रा. डॉ. अहिरे यांनी भाषेला अभिजात भाषेचा (classical language) दर्जा (status) मिळण्यासाठी जे महत्त्वाचे चार निकष लावले जातात त्यावर विस्ताराने चर्चा करत सर्व निकषात मराठी भाषा (Marathi Language) पात्र असुन देखील अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही म्हणून त्यांनी मंत्रीमंडळाच्या उदासिनतेबद्दल खंत व्यक्त केली.

आपल्या प्रास्ताविकात मराठी विभाग प्रमुख प्रा. ललिता हिंगोणेकर यांनी मराठी भाषा गौरव दीन साजरा करण्यामागील भुमिका नमुद केली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र देशमुख यांनी मराठी भाषेचा कणा मजबूत करण्यासाठी आयुष्य झिजवणार्‍या तात्यासाहेब वि. वा. शिरवाडकरांची कणा या कवितेच्या भावनिक सादरीकरणाने अध्यक्षीय समारोप केला.

सुत्रसंचलन मराठी विभागाचे प्रा. रत्नाकर कोळी यांनी तर पाहूण्यांचा परिचय आणि आभारप्रदर्शन मराठी विभागाच्या प्रा. रिना पवार यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com