एस.टी.बसमध्ये महिलेच्या पर्समधून ९९ हजारांचा ऐवज लंपास

एस.टी.बसमध्ये महिलेच्या पर्समधून ९९ हजारांचा ऐवज लंपास

गुजरात पेट्रोल पंप ते कांताई नेत्रालयादरम्यान प्रवासात घटना

जळगाव - Jalgaon

शहरातील (Gujral Petrol Pump) गुजराल पेट्रोलपंप येथुन बसमध्ये बसलेल्या महिलेचा पर्समधुन ५०० मीटरच्या अंतराच्या प्रवासातच ९९ हजारांचा ऐवज असलेली लंपास झाल्याची घटना शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका (police) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईमधील टिटवाळा येथील शुभांगी जितेंद्र माळी वय ४२ या जळगाव शहरातील गुजराल पेट्रोलपंप परिसरातील त्यांचे नाते वाईकाकडे आल्या आहेत. त्या शनिवार, २ ऑक्टोबर रोजी दुपारी यावल तालुक्यातील किनगाव येथे जाण्यासाठी गुजराल पेट्रोलपं स्टॉप येथुन एस. टी.बसमध्ये बसल्या. काही अंतरावर कांताई नेत्रालयापर्यंत बस पोहोचली असता शुभांगी माळी यांना त्यांच्याकडील पर्समध्ये ठेवलेले ८५ हजारांचे दागिने व १४ हजार रुपये रोख अशा एकुण ९९ हजारांचा ऐवज मिळुन आला नाही. बसमध्ये सर्वत्र शोधाशोध केली. मात्र ऐवज मिळाला नाही. चोरी झाल्याची खात्री झाल्यावर शुभांगी माळी या कांताई नेत्रालय जवळच उतरल्या. व तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक नरेंद्र पाटील हे करीत आहेत

Related Stories

No stories found.