ललित कोल्हे यांचा जामीन फेटाळला

माजी महापौर ललित कोल्हे
माजी महापौर ललित कोल्हे

जळगाव - Jalgaon :

शहरातील बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावरील प्राणघातक हल्लाप्रकरणातील आरोपी व माजी महापौर ललित कोल्हे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.हा हल्ला १६ जानेवारी रोजी सायंकाळी स्टेशन रोडवरील एका जिमखान्यात झाला होता.

याप्रकरणी ललित कोल्हे यांना २७ मे रोजी व त्यांच्या साथीदारांना या अगोदर पोलिसांनी अटक केली आहे. कोल्हे सध्या डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

त्यांनी जामीनसाठी अर्ज केला होता. हा जामीन अर्ज न्या. आर.एन.हिवसे यांनी फेटाळला. सरकारतर्फे ऍड.नीलेश चौधरी यांनी कामकाज पाहिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com