भिकमचंदनगर, गुड्डूराजा नगरात लाखो लीटर पाण्याची नासाडी

जलवाहिनीला गळती; आंदोलनाचा पवित्रा, महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष
भिकमचंदनगर, गुड्डूराजा नगरात लाखो 
लीटर पाण्याची नासाडी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील पिंप्राळा गेट परिसरातील भिकमचंदनगर, गुड्डू राजा नगर येथे नवीन व जुन्या जलवाहिनी फुटलेल्या (Water pipes burst) आहे. त्यामुळे लाखो लीटर पाणी (Waste of water) दररोज वाया जात असून रस्त्यांवर पाणी पाणी साचत आहे. त्यामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने अपघात होत आहे. याबाबत मनपाच्या पाणीपुरवठा विभागाला (Municipal Water Supply Department) नागरिकांनी (Citizens) तक्रार (complaint) करून सुध्दा याकडे दुर्लक्ष (ignore) केले आहे. याबाबत त्वरीत जलवाहिनी गळती दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

भिकमचंद नगर, गुडुराजा नगरात अमृत योजना अंतर्गत नागरिकांना नवीन नळ कनेक्शन दिलेले आहेत. परंतु हे कनेक्शन देत असतांना जुनी व नवीन पाईपलाईन काही ठिकाणी तुटलेल्या आहे. जलवाहिनी गळतीमुळे गेल्या आठ-दहा दिवसांपासून अक्षरशः लाखो लिटर्स पाणी वाया जात आहे. त्यामुळे कॉलनीतील रस्त्यांवर ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचले आहेत. त्यामुळे चिखलात वाहने घसरून अपघात होत आहे. तसेच साचलल्या डबक्यांमुळे डासांचा उद्रेक वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने त्वरीत जलवाहिनी गळती दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

तर तिव्र आंदोलन करणार

मनपा प्रशासनाने त्वरीत दखल घेवून या जलवाहिनीची गळती त्वरित थांबवावी अन्यथा नागरिक आंदोलन आंदोलनाच्या पवित्र्यात असतिल असेही काही तक्रारदारांनी सांगितले आहे. स्थानिक नगरसेवक आणि संबंधित विभागाने लक्ष घालून गुड्डूराजा नगर येथील ही समस्या सोडवावी अशी विनंती केली आहे.

महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष

या समस्येबाबत महानगरपालिका प्रशासनाला भिकमचंदनगर व गुडुराजा नगरातील नागरिकांच्या तक्रार केली. परंतू याकडे मनपाच्या संबधित विभागाच्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com