महिलांनो रस्त्याने पायी फिरताय..तरही बातमी तुमच्यासाठी आहे..खास

महिलांनो रस्त्याने पायी फिरताय..तरही बातमी तुमच्यासाठी आहे..खास

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील आकाशवाणी चौकातून भरदिवसा 60 वर्षीय वृद्ध महिलेच्या (old woman) गळ्यातून 26 ग्रॅम वजनाचे सोन्याची चैन (Chain of gold) चोरट्यांनी चोरून (Stealed by thieves) नेल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी घडली या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशाबाई रविंद्र पाटील (वय-60, रा. कुंभारखेडा ता.जि.जळगाव) या वयोवृद्धा बुधवार 18 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता आपल्या वैयक्तिक कामासाठी आकाशवाणी चौक येथे आलेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्याजवळ येवून सोन्याची 26 ग्रॅम वजनाची चैन हातचलाखिने त्यांच्या जवळून चोरून नेली. हा प्रकार वृद्ध महिलेच्या लक्षात येताच सोन्याची चैनचा सर्वत्र शोध घेतला परंतु मिळून आल्याने. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस कर्मचारी वंदना राठोड करीत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com