चाळीसगावातील रस्त्यांवर दिशादर्शक फलकांचा अभाव

बांधकाम व संबंधीत विभागाचे दुर्लक्ष, वाहनधारकांना होतो मनस्ताप
चाळीसगावातील रस्त्यांवर दिशादर्शक फलकांचा अभाव

मनोहर कांडेकर

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगावतून दोन महामार्गांसह अनेक रस्ते आहेत. या रस्त्यांवर अपघात होवून मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्या चिंतेची बाब आहे. अपघात आणि त्यामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी महामार्गांसह इतर रस्त्यांवर गतिरोधक, वळण, थांबा इ. अगोदर दिशादर्शक फलक लावणे अवश्यक आहेत. परंतू नवीन जळगाव-चांदवड महामार्ग वगळत (Kannada Ghat) कन्नड घाट व इतर रस्त्यावर दिशादर्शक फलक दिसून येत नाहीत. त्यामुळे अनेक लहान-मोठे अपघातात नित्यांचेच झाले आहेत. या रस्त्यांवर त्वरित दिशादर्शक फलक लावण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

तालुक्यातील सर्वच रस्त्यांवर बहुतेक ठिकाणी वाहतुकीबाबतच्या सूचना, दिशादर्शक चिन्हे, फलक नसल्याचे दिसून येत आहे. वळण, थांब्याबाबत फलक, महामार्गावर गाडी किती वेगाने चालवावी याचा फलक व दिशादर्शक चिन्ह नसल्यामुळे वाहनकारधारांची दिशाभूल होत असून ते चुकीच्या मार्गाने वाहन चालवतात. त्यामुळे अनेक वाहनधारक इच्छीत स्थळी न पोहचता रस्ता भरकटतात.

तर लहान-मोठे अपघातात नित्याचेच झाले आहे. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघनही रोज होत असल्योन अनेकांना आर्थिक भुर्दंड बसतो. तालुक्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. तर प्रमुख जिल्हामार्ग ८ आहे. यावैतिरिक्त तालुक्यातून जिल्हा परिषद, ग्रामीण अनेक रस्ते आहेत. यातील अनेक रस्त्यावर ठिकठिकाणी सूचना, दिशादर्शक चिन्हे, फलक नसल्याचे दिसून येते.

यामुळे वाहनधारकाना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील महामार्गांसह सर्व रस्त्यांवर त्वरित सूचना, दिशादर्शक चिन्हे, फलक लावण्याची मागणी होत आहे. तसेच नगरपरिषद स्तरावर रस्ता सुरक्षा समिती गठीत करण्यात आली आहे का? नाही हे सुध्दा नागरिकांना माहित नाही. त्यामुळे यासंपूर्ण प्रकरणाची चौकशी होवून, सूचना फलकांबाबतच्या कामात कुचराई करणार्‍या आधिकार्‍यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com