
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
सेंट्रींग काम करतांना ग्रँडरमध्ये उतरलेल्या विजेच्या धक्क्याने मजूर (Laborer) दुसर्या मजल्यावरुन खाली (falling) कोसळल्याची घटना गुरुवारी घडली होती. यात गंभीर जखमी झालेल्या संजय रामभाऊ पाटील (वय-42, रा. गेंदालाल मिल) यांचा उपचार सुरु असतांना रविवारी दुपारी प्राणज्योत (dies) मालवली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील गेंदालाल मिल परिसरात संजय पाटील हे कुटुंबियांसह वास्तव्यास होते. सेंट्रींग काम करुन ते कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. गुरुवारी दि. 16 रोजी कानळदा रोडवरील के. सी. पार्कजवळ बांधकामाची साईट सुरु असून त्याठिकाणी संजय पाटील हे सेंट्रींग काम करीत होते. ग्रँडरवर काम करीत असतांना ग्रँडरमध्ये उतरलेल्या विजेच्या धक्का लागून संजय पाटील हे दुसर्या मजल्यावरुन खाली कोसळले. यात त्यांच्या पोटाला, हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु होते.
शस्त्रक्रिया झाल्यानंतर उपचार सुरु असतांना मालवली प्राणज्योत
दुसर्यावरुन पडल्याने तसेच त्यांचा विजेचा जोरदार धक्का बसल्याने गंभीर अवस्थेत असलेल्या संजय पाटील यांच्यावर शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर पाटील यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचार सुरु असतांना रविवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.