राजोरा येथील कोविड लसीकरण केंद्राची जि.प. मुख्यकार्यकारी अधिकार्‍यांनी केली पाहणी

 राजोरा येथील कोविड लसीकरण केंद्राची जि.प. मुख्यकार्यकारी अधिकार्‍यांनी केली पाहणी
राजोरा येथील कोविड लसीकरण केंद्र ( छाया: अरुण पाटील यावल)

यावल Yaval ( प्रतिनिधी )

राजोरा येथे लसीकरणाचा (Vaccination) पहिला टप्पा पूर्ण झाला होता याच अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया (Zilla Parishad Chief Executive Officer Dr. Pankaj Asia) यांनी 4 जानेवारी रोजी भेट देऊन आरोग्य उपकेंद्रात (health sub-center) कोविड लसीकरण (Covid vaccination) संदर्भात विचारपूस केली. दुसऱ्या डोस कोविड लसीकरणाची राहिलेली असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमंत बर्‍हाटे (Taluka Medical Officer Dr. Hemant Barhaate) यांनी दिली

कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तर सर्वांनी जर असा विचार केला तर निश्चित कोरोनावर आपण मात करू शकतो व या रोगाचा प्रादुर्भाव करण्यासाठी सर्व नागरिकांनी स्वेच्छेने पुढाकार घेऊन स्वतः दुसरा डोस घेऊन टाकावा असे आव्हान डॉक्टर पंकज यांनी केले

त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा जाऊन कामकाजाची माहिती घेतली. याप्रसंगी ग्रामसेवक प्रवीण चौधरी यांच्याकडून माहिती घेऊन गावातील समस्या काय आहेत का? या संदर्भात विचारपूस केली यावेळी सरपंच पुष्पा गिरधर पाटील तसेच डॉक्टर तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत बऱ्हाटे तसेच मधुकर नारखेडे व गिरधर पाटील यांनी मुख्याधिकारी जिल्हा परिषद जळगाव डॉक्टर पंकज यांचा सत्कार केला . याप्रसंगी डॉक्टर प्राजक्ता चव्हाण भालोद आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी, व राजोरा उपकेंद्र डॉक्टर झाकीर हुसेन पिंजारी तसेच चिखली, राजोरा येथील आशा वर्कर ,आरोग्य कर्मचारी उपस्थित होते .

याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य रोहिणी बोरोले, सुवर्णा महाजन, प्रभाकर सोनवणे तसेच विस्तार अधिकारी आरोग्य बी .सी पाटील उपस्थित होते. याप्रसंगी विविध लसीकरण ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कर्मचाऱ्यांना कामकाजासंदर्भात सूचना देऊन बळ दिले

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com