
जळगाव - jalgaon
अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्या डंपरवर कारवाई न करण्यासह वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी 25 हजारांची लाच स्वीकारताना नायब तहसीलदाराला एसीबीच्या पथकाने अटक केली आहे.
धरणगावचे नायब तहसीलदा जयंत पुंडलिक भट व कोतवाल राहुल नवल शिरोडे यांना जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्या डंपरवर कारवाई न करण्यासह वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी 30 हजारांची लाच मागून तडजोडीअंती 25 हजारांची लाच स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांनी हा सापळा यशस्वी केला.