चोपड्यात पूर्व वैमानस्यातून एकावर चाकू हल्ला

दोघांना अटक
चोपड्यात पूर्व वैमानस्यातून एकावर चाकू हल्ला

चोपडा Chopda ( प्रतिनिधी )
पूर्व वैमानस्यातून (From East Aviation) एकावर चाकू हल्ला (Knife attack) झाल्याची घटना (Incident) शहरात दि.२९ डिसेंबर रोजी घडली.

हल्ला प्रकरणी पोलिसांनी दोघांना लागलीच ताब्यात घेऊन अटक केली होती.संशयित आरोपींना आज दि.३० डिसेंबर रोजी गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना एक दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे. पोलीस वेळीच घटनास्थळावर पोहचल्याने दोन समुदायातील तणाव निवळून होणारा अनर्थ टळला असून,शहरातील सानेगुरुजी वसाहत मध्ये पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

शहरातील सानेगुरुजी वसाहत मधील रहिवाशी गुलाम रसुल मस्तान मोमीन (वय-२१) हा दि.२९ डिसेंबर रोजी बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास कामावरून घरी जात पायी असतांना सार्वजनिक शौचालया समोर उभा असलेला आकाश संतोष भोई याने विनाकारण वाद उपस्थित करून गुलाम रसुल मस्तान मोमीन यास धरून शिवीगाळ करुन चापटा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच आकाश भोई याने पॅन्टच्या खिश्यातील चाकू काढून फिर्यादी गुलाम मोमीन याच्या गळ्यावर दोनवेळा वार करून गंभीर दुखापत केली आणि जिवेठार मारण्याची धमकी दिली.

सदर घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक
अवतारसिंह चव्हाण,सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साळवे,सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, विनोद पाटील,पो.हे.कॉ.सुनील पाटील,पो.हे.कॉ. जितेंद्र सोनवणे,पो.ना.विलेश सोनवणे, पो.ना. शेषराव तोरे,पो.ना.संतोष पारधी,पो.ना.ज्ञानेश्वर जवागे,पो.ना.दीपक सोनवणे,पो.ना.मिलिंद सपकाळे,पो.कॉ.प्रकाश मथुरे,पो.कॉ.रवींद्र पाटील,पो.कॉ.लहू सोनवणे आदी पोलीस कर्मचारी घटनास्थळावर पोहचून हल्लेखोराला ताब्यात घेऊन अटक केली.पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने दोन समुदायातील तणाव निवळून होणारा अनर्थ टळला.

घटनेच्या पार्श्वभूमीवर सानेगुरुजी वसाहत व भोकरवाडा भागात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून पोलीस पेट्रोलींग नेमण्यात आली असून,परीसरात शांतता असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.दरम्यान आज गुरुवारी दुपारी सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषिकेष रावले यांनी घटना स्थळाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

या प्रकरणी गुलाम रसुल मस्तान मोमीन (वय- २१) रा.सानेगुरुजी वसाहत यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला गुरनं.४२८/२०२१ नुसार शिवाजी संतोष भोई आकाश संतोष भोई दोन्ही राहणार सानेगुरुजी वसाहत चोपडा यांच्या विरुद्ध भादवि कलम ३०७,३२३,५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान दोन्ही संशयित आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना एक दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com