किसान शिक्षण संस्था एक आदर्श संस्था- गायक सलील कुलकर्णी

किसान शिक्षण संस्था एक आदर्श संस्था- गायक सलील कुलकर्णी

भडगाव - Bhadgaon

कर्मविर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्था (Karmaveer Tatyasaheb Hari Ravji Patil Kisan Shikshan Sanstha) ग्रामिण भागात ज्ञानदानाचे (Enlightenment) पवित्र असे कार्य करत आहे. संस्थेच्या प्रगतीचा आलेख (Graph of progress) पाहीला असता संस्थेचा एक आदर्श शिक्षण संस्था (Adarsh Shikshan Sanstha) म्हणून गौरव व्हावा. असे मत प्रसिध्द गायक सलील कुलकर्णी (Singers Salil Kulkarni) यांनी व्यक्त केले.

कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्थ तर्फे संस्थेच्या सचिव स्व.साधनाताई प्रतापराव पाटील यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त भडगाव येथे प्रख्यात गायक सलील कुलकर्णी व संदिप खरे निर्मित "आयुष्यावर बोलु काही" ह्या सुंदर अशा हृदयस्पर्शी कार्यक्रमांचे आयोजन संस्थेच्या बाळद रोड स्थित डी.एड कॉलेजच्या प्रांगणात करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रारंभी संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील यांची जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा संस्थेतर्फे शाखेतील सर्व मुख्याध्यापकांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला तसेच त्यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल मानपत्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.. त्याचप्रमाणे संस्थेतील विविध शाखांमधील विविध स्पर्धा परिक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या ४५ विद्यार्थ्यांना "साधनाई सन्मान पुरस्काराने" गौरवण्यात आले.तसेच शैक्षणिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल औरंगाबाद जिल्ह्यातील विनोद पवार यांना "साधनांई सन्मान" पुरस्कार देऊन सपत्नीक गौरवण्यात आले.

कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त व उदंड प्रतिसाद लाभला...सलील कुलकर्णी व संदिप खरे यांनी सादर केलेल्या अनेक बहारदार गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकुन घेतले. सलील कुलकर्णी यांनी सादर केलेल्या कोमेजून निजलेली एक परि राणी या भावपूर्ण गाण्याने अनेकांचे डोळे पाणावले. अगं बाई ढग्गो बाई गाण्यात प्रेक्षकांमधुन लहान मुलांना सदर गाण्यात सामावून घेऊन सादर केलेले गाणे अफलातून होते..

कार्यक्रमाविषयी बोलतांना सलील कुलकर्णी यांनी संस्थेस सुरू असलेल्या विविध उपक्रमाबद्दल मनापासून विशेष कौतुक केले. संस्थेचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य हे आदर्शवादी असे आहे,असे प्रतिपादन केले..

कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे संस्थेच्या सचिव डॉ.पुनम पाटील यांनी आभार मानुन कार्यक्रम आयोजनाचा हेतु स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक भोसले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेतील सर्व शाखांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com