
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात निवृत्ती महाराज इंदुरीकर (Indurikar Maharaj) यांच्या किर्तनाचे (Kirtan) आयोजन करण्यात आले आहे.
शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने जळगावातील पिंप्राळा येथील श्रीराम संस्थानच्या मैदानावर दि. 4 मे रोजी सायंकाळी 7 ते रात्री 9 वाजता या कालवधीत शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या मानराज पार्कनजीकच्या श्रीराम मंदिराच्या मैदानावर निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. या किर्तनाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ह.भ.प. गौ-प्रेमी गजानन महाराज वरसाडेकर यांनी केले आहे.