किरणकुमार बकालेंचा पाय आणखी खोलात

विनयभंगाचे कलम वाढले ; मराठा समाजातर्फे 10 हजार स्वाक्षरींचे अभियान
किरणकुमार बकालेंचा पाय आणखी खोलात

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

स्थानिक गुन्हे शाखेच्या (local crime branch) तत्कालीन निरीक्षक किरणकुमार बकाले (Inspector Kiran Kumar Bakale) याने मराठा समाजाबद्दल (Maratha community) केलेल्या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी (Offensive statement) किरणकुमार बकाले यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. महिला सदस्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आज जिल्हापेठ पोलिसात किरणकुमार बकालेविरूध्द महिलांविरूध्द आक्षेपार्ह विधान (Offensive statement) केले म्हणून विनयभंगाचे कलम (molestation clause) वाढविण्यात आले आहे. दरम्यान बकालेला बडतर्फ करावे या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे गुरूवारी शिवतीर्थ मैदान आणि सागर पार्क परिसरात स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.

स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबीत पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी आपल्या कर्मचार्‍याशी बोलताना मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे संपूर्ण मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे. यासाठी त्याला तत्काळ बडतर्फ करण्यात यावे, यासाठी सकल मराठा समाजातर्फे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आले.

बॅरिस्टर निकम चौक आणि शिवतीर्थ मैदान येथे हे अभियान राबविण्यात आले असून मराठा समाजासह इतरही नागरिकांनी 10 हजारांपेक्षा अधिक स्वाक्षर्‍या करून बकालेंच्या बडतर्फीची मागणी केली आहे.

दरम्यान स्वाक्षर्‍यांचे निवेदन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांना देण्यात येणार असून बकालेंवर तात्काळ कारवाई करावी, यासाठी मराठा समाज यापुढे अधिक आक्रमक होईल असा इशाराही देण्यात येणार आहे.

महिला समितीने घेतली पोलीस निरीक्षकांची भेट

सकल मराठा समाजातील महिला समितीने आज जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन बकालेविरूध्द विनयभंगाची तक्रार दाखल केली. त्यामुळे बकालेंवरील गुन्ह्यात आता कलम 354 ची वाढ झाली असल्याने त्यांचा पाय आणखीनच खोलात गेला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com