पैशांच्या व्यवहारातून तिघांचे अपहरण

रामानंदनगर पोलिसांकडून पर्दाफाश ः 40 लाख रुपये वसुली करण्यासाठी दिली होती सुपारी
पैशांच्या व्यवहारातून तिघांचे अपहरण

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

बायोडिझेलच्या ( biodiesel) व्रिकीसह खरेदीच्या व्यवहारापोटी (Transaction) दिलेले व्याजासह एकूण 40 लाख रुपये परत दिले नाही म्हणून मयूर वसंत सोनवणे (Mayūra vasanta sōnavaṇē) उर्फ महाजन वय 35 रा. जिजाऊ नगर, जळगाव या बांधकाम व्यावसायिकांला (Builders) मारण्यासाठी(kill) सात आठ जणांना सुपारी दिली. तसेच सुपारी घेतलेल्या सात ते आठ जणांनी पैशांसाठी मयूर महाजन यांच्यासह त्याच्या दोन्ही चालकांना नाशिक, संगमनेर, अजिंठा अशा वेगवेगळ्या ठिकाणी डांबून ठेवत बंदुकीच्या गोळयांसह वेगवेगळ्याप्रकारे जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यादरम्यान बांधकाम व्यावसायिक मयूर महाजन यांनी पैसे मागविण्याच्या बहाण्याने मोबाईलवरुन पत्नीसह बहिणीला लोकेशन पाठविले. त्यानुसार प्रकरण पोलिसात पोहचल्यावर रामानंदनगर पोलिसांनी (Ramanandnagar Police) सिनेस्टाईल घडलेल्या या प्रकरणाचा पर्दाफाश केला असून बांधकाम व्यावसायिक महाजन यांच्यासह त्यांच्या चालकांची सुटका करुन आठ जणांना ताब्यात घेतले आहे.

जिजाऊ नगरातील मयूर सोनवणे उर्फ महाजन यांची नाशिक येथे संस्कार एंटरप्रायजेस नावाची फर्म आहे. चार महिन्यांपूर्वी महाजन हे बायोडिझेल होलसेल विक्रीचा व्यवसाय करत होते. यादरम्यान त्यांची मलिक नावाच्या व्यक्तीसोबत ओळखी झाली. ओळखीतून मलीक याच्यासोबत महाजन यांचा बायोडिझेलचा व्यवहार झाला होता. या व्यवहारापोटील मलिक याने महाजन यांना 80 लाख रुपये दिले होते. त्यापैकी ठरल्याव्यवहाराप्रमाणे महाजन यांनी मलिक याला 78 लाख रुपये किंमतीचे चार टँकर बायोडिझेल पुरविले होते. दोन लाख रुपये बाकी असतांना, मलीक याने फोन करुन महाजन यांना 18 लाख रुपये बाकी असल्याचे सांगितले. तसेच व्याजासह ही रक्कम 40 लाख रुपये असून ती रक्कम परत करण्याचे महाजन यांना सांगितले. कोरोना असल्याने व्यवहार बंद हाोता. त्यामुळे महाजन यांना मलिक याची उर्वरीत रक्कम परत करता आली नाही.

पैसे मागविण्याचा बहाणा अन् मोबाईलवरुन पाठविले लोकेशन

सिल्लोड रोडने महाजन यांच्यासह त्यांच्या चालकांना घेवून जात असतांना महाजन यांनी संबंधितांना तुम्हाला देण्याासाठी पैसे मागवायचे आहेत. त्यासाठी मोबाईल मागितला. यादरम्यान महाजन यांनी त्यांची पत्नी शमीका हिच्याशी बोलणे करुन तिला मोबाईलवरुन लोकेशन पाठविले. तसेच महाजन यांनी त्यांची जळगावातील बहिण माधुरी चव्हाण हिला सुध्दा लोकेशन पाठविले. हा प्रकार महाजन यांनी संबंधितांना कळू दिला नाही. जळगावात लोकेशन तसेच महाजन यांच्यासोबत घडल्याप्रकाराबाबत महाजन यांची बहिणी माधुरी चव्हाण हिने रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीनुसार पोलिसांनी महाजन यांच्या मोबाईल लोकेशनवरुन सिल्लोडरोडवरील साईमिलन हॉटेल गाठले. तसेच डांबून ठेवलेल्या महाजन यांच्यासह त्यांचे चालक विजय सुभाष इंगळे व सागर जीवन विसपूते या तिघांची पोलिसांन सुटका केली.

आठ जण ताब्यात

घटनास्थळावरुन पोलिसांनी अमजद दाऊद सैय्यद, शेख बिलाल गुलाम, मजाज दाऊद सैय्यद, अब्दुल नासिर गफ्फार, इम्रान इलियास शेख, अजीम अजीज शेख, शहानवाज वजीन खान, अबुकर सलीम मलीक या आठ जणांना ताब्यात घेतले. दोन जण गाडीतून पसार झाले आहे. दोन दिवसांनंतर सुखरुप सुटका झाल्यानंतर मयूर महाजन यांनी घडल्याप्रकाराबाबत शनिवारी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खुलताबाद, संगमनेरसह अजिंठ्याला हॉटेलात डांबले

मयुर महाजन यांच्यासह त्यांच्या दोन्ही चालकांना शेख गुलाम यांच्यासह अमजद दाऊद सैय्यद, अजीम शेख, अब्दुल नासीर, मजाज सैय्यद यांनी नाशिक येथील संगमनेर येथे नेले. तेथून खुलताबाद येथील बंद जिनींगमध्ये डांबून ठेवत 40 लाख रुपयांची मागणी केली. नाही दिले तुमच्यासह दोन्ही चालकांना मारुन टाकण्याची धमकी संबंधितानीं महाजन यांना दिली. तेथून खुलताबाद येथून महाजन व त्यांच्या दोन्ही चालकांना सबंधित अजिंठा येथे घेवून गेले. तसेच सिल्लोड रोडवरील साईमिलन या हॉटेलात महाजन यांच्यासह त्यांच्या चालकांना डांबून ठेवले. याठिकाणी मलिक याचा लहान भाऊ अबुकर सलीम मलिकहा याने सुध्दा महाजन यांना 40 लाख रुपये देवून टाक नाहीतर मारुन टाकण्याची धमकी दिली.

बायोडिझेल मशीन खरेदीचा बहाणा करत किडनॅपिंग

12 जानेवारी रोजी मयुर महाजन हे त्यांच्या दोन्ही चालकांसह त्यांच्या एम.एच19 ए.एफ.8055 या क्रमाकांच्या चारचाकीने प्रभात चौकात गेले होते. यादरम्यान एका ठिकाणी गाडी उभी करुन थांबलेले असतांना, शेख बिलाल गुलाम याचा महाजन यांना फोन आला. बायोडिझेलची नोझल मशीनची ऑर्डर द्यावयाची असून ती घेण्यासाठी तुमच्या मित्राकडे नाशिकला जावयाचे असल्याने संबंधिताने महाजन यांना सांगितले. महाजन यांनी होकार दिल्यावर शेख गुलाम याने त्याच्या गाडीत महाजन यांना बसविले. त्यांच्या मागे महाजन यांचे दोन्ही चालक त्यांची गाडी घेवून येत होते. नाशिकला पोहचल्यावर याठिकाणी एका ऑफिसात घेवून जात याठिकाणी सात ते आठ जणांनी महाजन व त्यांचे चालकांचे मोबाईल हिसकावून घेतले. यावेळी महाजन यांनी नेमका काय प्रकार सुरु आहे, याबाबत विचारले असता मलिक याने आम्हाला सुपारी दिली असून त्याचे 40 लाख रुपये देवून टाक नाहीतर तुला जळगावला घेवून जावून व बंदुकीच्या गोळ्या मारुन टाकू, सोडणार नाही अशी धमकी शेख गुलाम याने महाजनांना दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com