
चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी -
शहरालगत असलेल्या टाकळी प्र.चा. येथील कालिकानगरमध्ये राहणार्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी (girl) घरातून कुल्फी घेण्यासाठी दुकानात गेली असता, अज्ञात व्यक्तीने दिला फूस लावून (Kidnapped) पळवून नेल्याची घटना दि,२६ रोजी घडली आहे. याप्रकरणी चाळीसगव पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, टाकळी प्र.चा. ता. चाळीसगाव. येथील कालिकानगर येथे राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी दिनांक २६/०२/२०२३ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास दुकानावर कुल्फी घेण्यासाठी जाते असे सांगुन घरुन गेली, ती अद्यापावोतो घरी आलीच नाही. मुलीच्या कुटूंबाने आजुबाजुला राहणारे शेजारी लोकांकडे विचारपुस करुन शोध घेतला, परंतु ती कुठेच मिळुन आली नाही.
तसेच तिचा चाळीसगाव शहरातील बस स्टैंड, सिग्नल चौक, रेल्वे स्टेशन परिसरात, इतर नातेवाईकांकडे शोध घेतला परंतु ती मिळुन आली नाही. म्हणुन मुलीच्या वडिला पक्की खात्री झाली की, तिचा अज्ञानपणाचा फायदा घेऊन तिस काहितरी फुस लावुन, अमिष दाखवुन कोणीतरी अज्ञात इसमाने कायदेशीर रखवालीतुन तिला पळवून नेले आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन विविध कलन्वय गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.