वि.का.सोसायटीत सहकार पॅनल ; विजयाची हॅट्रिक

चाळीसगाव : जिल्हा बँकेंने गौरविलेल्या खेडगाव सोसायटीच्या निवडणुकीत १३ जागावर विजयश्री
वि.का.सोसायटीत सहकार पॅनल ; विजयाची हॅट्रिक

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील खेडगाव (Khedgaon) येथील वार्षिक साडे पाच कोटीची आर्थिक उलाढाल असणार्‍या आणि जिल्हा बँकेंने (District Bank) गौरविलेल्या खेडगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत (Election) अविनाश चौधरी यांच्या नेतृत्वाखालील सहकार पनलने सर्व १३ जागा जिंकून सलग तिसर्‍यांदा विजयश्री खेचून आनला आहे. तर प्रतिस्पर्धी प्रफुल्ल साळुंखे व पंकज साळुंखे यांच्या पॅनलचा पूर्णता; सुफडासाफ केला आहे.

या रणधुमाळीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. खेडगाव, खेडी व दस्केबर्डी या गावांचे कार्यक्षेत्र असणार्‍या सोसायटीच्या निवडणुकीसाठी महिला राखीवसह ओबीसी, अनु. जाती-जमाती, व कर्जदार खाते प्रतिनिधी अशा एकुण १२ जागांसाठी चुरशीची लढती झाल्या. संस्थेचे १६५० सभासद आहे. सहकार पनलचे अविनाश चौधरी यांना सर्वाधिक ६५९ मते मिळाली. भानुदास लुका रावते हे भटक्या - विमुक्त गटातून बिनविरोध निवडून आले आहे. यामुळे प्रतिस्पर्ध्यांना विजयाचे खातेही उघडता आले नाही. रविवारी सकाळी ८ ते दुपारी चार यावेळात मतदान प्रक्रिया पार पडली. यानंतर मतमोजणी करण्यात आली. यात सहकार पनलने प्रतिस्पर्धी पनलचा धुव्वा उडवला. निवडणुक यशस्वी करण्यासाठी अरुण पाटील, के.बी.साळुंखे, रावसाहेब साळुंखे, मोहन चौधरी, पांडुरंग माळी, देवीदास साळुंखे, खेडी सरपंच संजय हिंमत पाटील, हिंमत महाजन, आर. डी. चौधरी, परमेश्वर रावते, दगडू पाटील, दस्केबर्डी सरपंच गणेश अहिरे, शब्बीर सुलेमान पिंजारी, जयराम पांडू पाटील, संभाजी साळुंखे, संभाजी बारीकराव साळुंखे, रमेश सोनवणे, शांतीलाल अहिरे, सचीव संजय पाटील यांनी सहकार्य केले.

विजयी उमेदवार

लिलाबाई अरुण पाटील, मनिषा रमेश साळुंखे, अविनाश जगन्नाथ चौधरी, हिरामण पिरा केदार, भानुदास लुका रावते, छोटू गरबड पाटील, ज्ञानेश्वर बारकु पाटील, शिवाजी बळीराम महाजन, सुकलाल धोंडू महाजन, भिमराव कौतिक माळी, अशोक निळकंठ साळुंखे, दिनकर त्र्यंबक साळुंखे, विजय माधवराव साळुंखे. प्रतिनिधी-

'' गेल्या अनेक वर्षापासून सोसायटीत नेतृत्व करीत आहे. याकाळात संस्थेला उर्जितावस्था मिळवून दिली. सभासदांना न्याय देण्याची भूमिका घेतांना कारभार पारदर्शी ठेवला. यामुळेच खेडगाव, खेडी व दस्केबर्डी ग्रामस्थांनी सलग तिस-यांदा विजयी विश्वास दाखवला '' .

अविनाश जगन्नाथ चौधरी, खेडगाव

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com