पंचायतराज समितीकडून अधिकार्‍यांची खरडपटटी

जळगाव पंचायत समितीमध्ये पोषण आहार वितरणावरून गटशिक्षणाधिकार्‍यांची कानउघडणी
पंचायतराज समितीकडून अधिकार्‍यांची खरडपटटी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

पंचायतराज समितीने (Panchayat Raj Samiti) जिल्हाभरात मंगळवारी पंचायत समितीस्तरावर 4 आमदारांची टीम करून प्रत्येक तीन तालुक्यात दौरे करून आढावा घेण्यात आला. पारोळा व एरंडोल येथे एका टीमने दौरा करून सायंकाळी 6 वाजता पीआरसी जळगाव पंचायत समितीमध्ये ((Panchayat Samiti)) दाखल झाली. तब्बल दीड तास आढावा घेत पंचायतराज समितीने अधिकार्‍यांची (officials) चांगलीच खरडपटटी (Kharadpatti) काढली. दरम्यान,पोषण आहाराच्या (Nutritional diet) वितरणावरून गटशिक्षणाधिकार्‍यांची (Group Education Officers ) कानउघडणी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

समिती प्रमख आ.प्रतिभाताई धावेरकर यांच्यासह आ.सुभाष धोटे, आ.किशोर दराडे,आ.किशोर पाटील यांची समिती जळगाव पंचायत समितीमध्ये सायंकाळी दाखल झाली होती. या समितीचे स्वागत पं.स.सभापती ललिता पाटील,जनार्दन पाटील यांनी केले. आढावा घेत असतांना त्यांनी पोषण आहाराच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले. जळगाव तालुक्यात किती शाळांमध्ये पोषण आहार दिला? किती सॅम्पल तपासणीसाठी पाठविले? पोषण आहार वाटप करतांना आपण किती शाळांना भेटी दिल्या? या विषयावरून गटशिक्षणाधिकार्‍यांचा चांगलाच पाणउतारा करण्यात आला. यावेळी अधिकारी अनुत्तरीत झाले.तसेच शाळांमध्ये वाटप करण्यात आलेल्या टीव्ही संचाच्या खर्चाचा ताळमेळ जमत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.

ग्रामपंचायतीच्या 63 अफरातफरीचे प्रकरणे होती.त्यात कोट्यावधीची वसुली थकली आहे.यातील आरोप ठेवण्यात आलेले अनेक कर्मचार्‍यांचे,पदाधिकार्‍यांचे निधन झाले आहे. तर अनेक जण सेवानिवृत्त झाले असे असतांना दोषींवर गुन्हे दाखल का झाले नाही.चौकशी होवून दोषी असतांना गटविकास अधिकारीस्तरावरून कारवाई का झाली नाही? असा जाब विचारण्यात आला असल्याचे देखील सांगण्यात आले.

100 टक्के आहार वाटप कसा?

पंचायतराज समिती सदस्यांनी आहार वाटपाच्या मुद्यांवरून जळगाव पं.स.अधिकार्‍यांची कोंडी केली. विद्यर्थ्याची आरोग्य तपासणी करतांना विद्यार्थी 500 ते 600 अनुपस्थित दिसतात. ते स्थलांतरीत झाल्याची कारणे असतात. मात्र पोषण आहार वाटप करतांना मात्र 100 टक्के आहार वाटप होत असल्याचे दिसते हा विरोधाभास कसा? यावरून देखील अधिकार्‍यांची कोंडी करण्यात येवून पंचायतराज समितीने संबंधित अधिकार्‍यांचे कान टोचले असल्याचे सांगण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com