जळगाव jalgaon । प्रतिनिधी
गेल्या वीस वर्षांपासून कामगार उत्कर्ष सभा (Workers Utkarsh Sabha) आणि रेमंड व्यवस्थापन (Raymond Management) यांच्या सहकार्यायातून रेमंड कंपनी सुरळीत सुरु आहे. परंतु खान्देश युनिनकडूनमधील (Khandesh Yunin) गुंडांनी कर्मचारयांना धमकावून कंपनीत बंद (Closed in company) पाडली. त्यामुळे यासाठी खान्देश युनियनच जबाबदार असल्याचा आरोप उत्कर्ष सभेकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. तसेच कंपनीच्या परिसरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेश बंदीचे आदेश प्रांताधिकारी महेश सुधळकर यांनी काढले आहे.
रेमंड व्यवस्थापन आणि कामगार उत्कर्ष सभा यांच्याकडून सहा हजार रुपये वेतन करार करण्यात आला आहे. परंतु सत्ता असतांना ललित कोल्हे, अवधुत पाटील आणि भोजू महाजन यांनी कामगारांना लोखंडी रॉडने मारुन त्यांच्याकडून करार मंजूर करुन घेतला होता. रेमंड पतपेढीमध्ये खान्देश युनियनची सत्ता असतांना 85 लाखांचा गैरव्यवहार झाला आहे. तसेच मिठाई घोटाळा, सॉफ्टवेअर घोटाळ्यामुळे कर्मचार्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
खान्देश युनियमधील गुंडांनी कंपनीतील कर्मचार्यांना धमकावून त्यांच्याकडून कंपनी बंद करुन संप पुकारलेला आहे. त्यामुळे कामगारांचे आर्थीक नुकसान होत असून त्याला जबाबदार खान्देश युनियनच जबाबदार आहे. त्यामुळे कामगारांनी कामावर त्वरीत रुजू व्हावे असे परिपत्रक कामगार उत्कर्ष सभेकडून काढण्यात आले आहे.
अनधिकृत कर्मचार्यांना प्रवेश बंदी
रेमंड कंपनी परिसरात दि. 24 रोजी खान्देश कामगार उत्कर्ष संघटनेद्वारे कंपनीच्या परिसरात बेकायदेशीररित्या संप पुकारुन अडीचशे कामगारांना एकत्र जमवून कंपनीचे काम बंद पाडले होते. यापुर्वी देखील अशाच प्रकारचा संप पुकारण्यात आला होता. कंपनीच्या परिसरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचे लक्षात येताच कंपनी प्रशासनाने परिसरात कलम 144 लागू करण्याची विनंती केली होती.
त्यानुसार रेमंड कंपनीच्या परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणयासाठी कलम 144(1)(2)(3) या अधिकाराचा वापर करुन दि. 28 ते दि. 7 मार्चच्या रात्री 12 वाजेपर्यंत कंपनी परिसर व 200 मिटरच्या बाजूने अनधिकृत व्यक्ती किंवा समूह यांना प्रवेश बंदी करण्याचे आदेश प्रांताधिकारी महेश सुडळकर यांनी काढले.