
पारोळा - parola
शहरात साई हॉस्पिटलच्या (Hospital) माध्यमातून वैद्यकीय सेवा देणारे तसेच डॉ.संभाजीराजे पाटील फौंडेशन मार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबविणारे प्रसिद्ध गायनोलॉजिस्ट डॉ.संभाजी राजे पाटील यांना यावर्षीचा "खान्देश रत्न" पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सप्तरंग व स्टायलिंग स्टोन फौंडेशन यांच्या मार्फत जळगाव येथे या पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय सेवेबरोबरच पर्यावरण, कृषी, रोजगार, शिक्षण क्षेत्रातील कामाची दखल यावेळी घेण्यात आली। आतापर्यंतच्या कामाचा आढावा घेणारी चित्रफीत या कार्यक्रम दरम्यान दाखवण्यात आली.
सिनेअभिनेत्री पल्लवी पाटील (Actress Pallavi Patil) अँड.केतन ढाके अध्यक्ष जळगाव जिल्हा वकील संघ जळगाव, डॉ.प्रवीण पाचपांडे अध्यक्ष स्मायलींग स्टोन फाउंडेशन मुक्ताईनगर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.